शाहू नागरी पतसंस्थेतर्फे
२० टक्के लाभांश जाहीर
वडणगे : येथील शाहू नागरी सहकारी पतसंस्थेच्या ३८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत संस्थापक अध्यक्ष बी. एच. पाटील यांनी २० टक्के लाभांश जाहीर केला. लाभांशाचे वाटप १ सप्टेंबरपासून करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सभेत कर्जावरील व्याजदर कमी करणे, ठेवींवरील व्याजदर वाढविणे, कर्जमर्यादा व लॉकर संख्या वाढविणे तसेच कुटुंब कल्याण निधी वाढविण्याबाबत चर्चा झाली. प्रामाणिकपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या सभासदांना व्याजात तीन टक्के सूट देण्यात येत असल्याचेही सांगण्यात आले. व्यवस्थापक शहाजी साखळकर यांनी अहवाल वाचन केले. आर. बी. देवणे यांनी स्वागत केले. निवृत्ती चौगले यांनी आभार मानले. यावेळी सर्व संचालक, सभासद, कर्मचारी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.