02753
वडणगे : येथील ग्रामदैवत श्री पार्वती देवीची शुक्रवारी बांधण्यात आलेली ‘दशभुजा महाकाली’ रूपातील पूजा.
वडणगेत सोमवारी
रंगणार साखर उत्सव
राज्यातील आठ नामांकित ब्रास बँडमध्ये जुगलबंदी
सकाळ वृत्तसेवा
वडणगे, ता. १६ : येथे नवरात्रोत्सवानिमित्त सोमवारी (ता. १९) साखर उत्सव रंगणार आहे. यानिमित्त गावातील विविध गल्ल्यांतून सहभागी होणाऱ्या नामांकित बँड कंपन्यांच्या जुगलबंदीची रंगत मंगळवार (ता. २०) सकाळपर्यंत अनुभवायला मिळणार आहे.
ग्रामदैवत शंकर-पार्वती यांना जागरादिवशी साखर वाहण्याची परंपरा गेल्या शंभर वर्षांपासून सुरू आहे. पूर्वी प्रत्येक गल्लीतून पारंपरिक वाद्यांच्या गजरात ऐतिहासिक, सामाजिक व मनोरंजनपर सोंगे साकारून देवीला साखर आणली जात असे. मात्र, गेल्या तीन दशकांत या उत्सवाचे स्वरूप बदलले असून, आता राज्यासह परराज्यांतील नामांकित बँड कंपन्यांच्या जुगलबंदीने उत्सवाची रंगत वाढत आहे.
गेल्या पंधरा दिवसांपासून प्रत्येक गल्लीत उत्सवाची तयारी सुरू झाली आहे. कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत. सर्व गल्ल्यांत गल्लोगल्ली आकर्षक विद्युत रोषणाई केली असून, परिसर उजळून निघाला आहे.
यंदाच्या उत्सवात पार्वती गल्लीतील जय हिंद तालमीने सिद्धनाथ बँड कंपनी (सांगली), आंबे गल्लीतील सुभाष तालमीने राजेश बँड कंपनी (कऱ्हाड), विठ्ठल गल्लीतील विठ्ठल तालमीने लक्ष्मी बँड कंपनी (शेणोली स्टेशन, कऱ्हाड), मठगल्लीतील श्रीकृष्ण तालमीने न्यू सरस्वती बँड कंपनी (सौंदत्ती), चावडी गल्लीतील हनुमान तालमीने विश्वास बँड कंपनी (माधवनगर, सांगली), छत्रपती शिवाजी गल्लीतील शिवाजी तालमीने न्यू सिद्धेश्वर बँड कंपनी (सदलगा), इंदिरानगरने जय हनुमान बँड कंपनी (बेळगाव) आणि माळवाडीने प्रभात बँड कंपनी (किल्ले मच्छिंद्रगड) या ब्रास बॅंडना निमंत्रित केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.