कोल्हापूर

कोरे अभियांत्रिकीत उलगडला संत ज्ञानेश्वरांचा जीवनपट

CD

03648

कोरे अभियांत्रिकीत उलगडला
संत ज्ञानेश्वरांचा जीवनपट

वारणानगर, ता. २४ : तात्यासाहेब कोरे अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी महानाट्य ‘संत ज्ञानेश्वर’ सादर केले. महानाट्यात १०० हून अभियांत्रिकी कलाकार सहभागी झाले.
येथे तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग टेक्नॉलॉजी (ऑटोनोमस) महाविद्यालयात ४० वे स्नेहसंमेलन ‘स्पंदन २०२३’ची सांगता संत ज्ञानेश्वर संजीवन महानाट्याने झाली. महानाट्यात शंभरहून अधिक विद्यार्थ्यांनी अप्रतिम अभिनय, नेपथ्याचे सादरीकरण केले. ज्ञानेश्वरांचे बालपण, आई-वडिलांचा खडतर प्रवास, रेड्याच्या तोंडून वेद म्हणवून घेणे व चालणारी भिंत, त्यांची समाधी हे प्रसंग थक्क करणारे होते. संत ज्ञानेश्वरांची भूमिका शुभम सावंत, राधाची भूमिका तन्वी पाटीलने लीलया निभावली. डॉ. विनय कोरे म्हणाले, “संत ज्ञानेश्वर” महानाट्यात अभियंत्यांच्या अभिनयात जणू दैवी शक्ती संचारली. यावेळी वारणा बझारच्या अध्यक्षा शुभलक्ष्मी कोरे उपस्थित होत्या.
सहाय्य डॉ. वासंती रासम, प्राचार्य डॉ. सुनील आणेकर, स्नेहसंमेलन समन्वयक प्रा.व्ही. ए. भोसले, प्रा. जीवनकुमार शिंदे यांच्या दिग्दर्शनात साकारलेल्या महानाट्यने डोळ्यांचे पारणे फेडले. दिग्दर्शन सहाय्य प्रा. पी. आर. पाटील, प्रा. एस. एच. मोरे, प्रा. आर. बी. नाईक यांनी केले. नृत्य दिग्दर्शन योगिता नार्वेकर, शुभम कुंभार यांनी केले. प्रकाश योजना प्रा.जयवंत पाटील, नेपथ्य मेकॅनिकल इंजिनीअरिंग वर्कशॉप कर्मचारी यांनी केले. रंगभूषा- वेशभूषा सुनील मुसळे, ध्वनी संयोजन शुभम सुतार, ध्वनी मुद्रण निशिकांत सावर्डेकर यांनी केले.
तत्पूर्वी वार्षिक स्नेहसंमेलन स्पंदन २०२३ चे उद्घाटन डॉ. वासंती रासम यांच्या हस्ते झाले. यावेळी सुराज्य फौंडेशनचे अध्यक्ष एन. एच. पाटील, वारणा दूध संघाचे उपाध्यक्ष एच. आर. जाधवसह पालक, शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते. प्रा. जीवनकुमार शिंदे यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ponzi Scam: 100 कोटी रुपयांच्या पॉन्झी घोटाळ्याप्रकरणी ईडीचे पुणे, नाशिक अन् कोल्हापुरात छापे! काय आहे प्रकरण?

Ind vs Sa Series : भारत-दक्षिण आफ्रिका खेळणार ODI-कसोटी अन् टी-20 मालिका, 'या' महिन्यात रंगणार थरार

Success Mantra: तुमच्या 'या' सवयींमुळे खराब होऊ शकते करिअर, आजच करा बंद

Kasparov on Rahul Gandhi: माजी बुद्धिबळ चॅम्पियन गैरी कास्परोवनं केलं राहुल गांधींना ट्रोल म्हणाला, आधी रायबरेली...

Latest Marathi News Live Update : संभाजीनगरमध्ये सिलिंडर स्फोट, बालिका ठार, पाच जखमी

SCROLL FOR NEXT