पोखलेतील जेनेरिक औषध दुकानाचे
पंतप्रधानांच्या हस्ते आज ऑनलाईन उद्घाटन
सहकारी संस्थेचे महाराष्ट्रातील पहिलेच
वारणानगर, ता. २८ : केंद्र सरकारने सुरू केलेल्या आरोग्यदायी योजनेतील महाराष्ट्रातील पहिले जेनेरिक औषध दुकान सुरू करण्याचा मान पन्हाळा तालुक्यातील पोखले येथील बलभीम विकास सेवा संस्थेला मिळाला आहे. या दुकानाचे उद्घाटन गुरुवारी (ता. ३०) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन तर केंद्रीय राज्यमंत्री भगवंत खुबा आणि आमदार डॉ विनय कोरे यांच्या उपस्थितीत होईल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑगस्ट २०२३ पासून ग्रामीण भागातील विविध सहकारी सेवा संस्थांच्या माध्यमातून प्रत्येक गावांत जेनेरिक औषध मेडिकल दुकान योजना चालू केली आहे. योजनेंतर्गत ग्रामीण भागात परवडणाऱ्या दरात औषधे मिळावीत, म्हणून पंतप्रधानांनी ग्रामीण भागातील प्रत्येक गावांत जेनेरिक दुकान योजना राबविली आहे. पोखलेतील बलभीम विकास सेवा संस्थेला महाराष्ट्रातील पहिले जेनेरिक औषध मेडिकल दुकान सुरू करण्याचा मान मिळाला. गेल्या महिन्यात दुकानाचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार होते. मात्र काही कारणास्तव ते पुढे ढकलले. आज अचानक उद्घाटनाचा दिवस निश्चित झाला. या पार्श्वभूमीवर शाहूवाडी विभागाचे प्रांताधिकारी समीर शिंगटे, तहसीलदार माधवी जाधव व शासकीय अधिकाऱ्यांनी दिवसभर वरिष्ठांशी संपर्क साधून रूपरेषा निश्चित केली. यासाठी केंद्रीय ऊर्जा, रसायन व खते राज्यमंत्री भगवंत खुबा यांच्यासह यांच्यासह मान्यवर उपस्थित राहतील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.