कोल्हापूर

मुंबई पोलीस भरती २०२१-२२ च्या प्रतिक्षा यादीतील उमेदवारांचे प्रश्न विधानसभेत मांडू-

CD

04145
मुंबई पोलिस भरती प्रतीक्षा यादीतील
उमेदवारांचे प्रश्न विधानसभेत मांडू

वारणानगर, ता. ९ : गृह विभागात भरपूर प्रमाणात रिक्त पदे आहेत. मुंबई पोलिस दलात २६ हजार शिपाई पदे रिक्त आहेत. त्यापैकी पोलिस विभागाने २०२२ मध्ये १० हजार पदे भरण्याचा निर्णय घेतला. मात्र ७ हजार ०७६ पदांची (७० टक्के) भरती राबवली. ही भरती प्रक्रिया शंभर टक्के झाली नसल्यामुळे प्रतीक्षा यादीवरील उमेदवारांना लवकर सामावून घ्यावे, अशी मागणी प्रतीक्षा यादीतील उमेदवारांच्या शिष्टमंडळाने आमदार डॉ. विनय कोरे यांच्याकडे केली.
निवेदनात म्हटले आहे, ‘सध्या मुंबई पोलिसांवर ताण येत आहे. २०१४ पासून पोलिस विभागात महाभरती झाली नाही. मुंबई पोलिस विभागात अनेक जागा रिक्त असल्यामुळे पोलिस विभागाने भरती काढली; पण १०० टक्के पदांची भरती झाली नाही. त्यामुळे अन्याय होत असून मुंबई पोलिस भरती २०२१ मधील प्रतीक्षा यादीतील मुलांना निवड यादीत समावेश करावा. सरकारने न्याय द्यावा.’
निवेदन स्वीकारून प्रतीक्षा यादीतील उमेदवारांचे प्रश्न विधानसभेत मांडू; अशी ग्वाही आमदार डॉ. विनय कोरे यांनी दिली. यावेळी प्रतीक्षा यादीतील उमेदवार विशाल बारबोटे, सुशांत पाटील, ऋषीकेश पोवार, वैष्णवी पोवार, पल्लवी कांबळे, शीतल शिंदे, प्रियांका भोई, पंकज सोलापुरे, तुषार शिंदे, विनायक गायकवाड सहभागी झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : रत्नागिरीत पेट्रोल-डिझेल सोबत आता CNG चा तुटवडा

पायात काटा घुसला आणि संवेदना गायब, देऊळ बंद 2 च्या शूटिंग दरम्यान 4 महिने बेडरेस्टवर होते मोहन जोशी

Vaibhav Sooryavanshi चे वय विसरा, त्याला थेट टीम इंडियात घ्या.... रवी शास्त्रींची BCCI कडे थेट मागणी

Pune Metro Construction: सातारा रस्त्यावरील बसथांब्यांमुळे गोंधळ; मेट्रोच्या कामामुळे थांबे बंद, नियोजन करण्याची प्रवाशांची मागणी!

Pune Mumbai Travel: रस्ता सुसाट, तर हवाई प्रवास थंडावला; पुणे-मुंबई ‘मिसिंग लिंक’मुळे प्रवास वेगवान, उद्योजकांचे हेलिकॉप्टरकडे दुर्लक्ष!

SCROLL FOR NEXT