कोल्हापूर

देश घडवणारा अभियंता व्हा : डॉ. विनय कोरे कोरे अभियांत्रिकीत प्लेसमेंट डे चे यशस्वी आयोजन

CD

04572

देश घडवणारा अभियंता व्हा
डॉ. विनय कोरे ः कोरे अभियांत्रिकीत ‘प्लेसमेंट डे’

सकाळ वृत्तसेवा

वारणानगर, ता. १६ : ‘तुमची व आई-वडिलांची स्वप्ने घेऊन तुम्ही वारणेत आला. उत्कृष्ट अभियंते म्हणून स्वतःला सिद्ध केले. देश घडवणारा अभियंता बनण्याचा प्रयत्न करा,’’ असे आवाहन वारणा विविध उद्योग शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ. विनय कोरे यांनी केले.
येथील तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी (ऑटोनॉमस) महाविद्यालयात विविध कंपन्यांत निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या गौरवानिमित्त आयोजित केलेल्या प्लेसमेंट डे समारंभात ते बोलत होते. वारणा विभाग शिक्षण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ .व्ही. व्ही. कारजिन्नी म्हणाले, ‘‘तुम्ही अभियंत्यांनी स्वतःला सिद्ध केलेले आहे. भविष्यात कंपनीकडून असणाऱ्या आव्हानांचा सामना करण्यासाठी तत्पर राहा. महाविद्यालयातील प्राध्यापकांना इंडस्ट्री कनेक्ट प्रशिक्षण दिले जाईल.’’ ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. पी. जे. पाटील यांनी यावर्षी आत्तापर्यंत ५०० हून अधिक विद्यार्थ्यांचे विविध कंपन्यांमध्ये प्लेसमेंट झाले. ई अँड टीसी विभागाचे सलग ५ वर्षे १०० टक्के प्लेसमेंट झाल्याचे सांगितले. २०२४-२५ बॅचचे प्लेसमेंट याच वर्षी मे महिन्यात सुरू झाले. त्यामध्ये ३ विद्यार्थ्यांना ५.५ लाख रुपयांचे पॅकेज मिळाले.

निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी तात्यासाहेब कोरे यांनी सुरू केलेल्या अभियांत्रिकी महाविद्यालयाप्रति कृतज्ञता व्यक्त केली. वैष्णवी उलपे (७.५ लाख- रिलायन्स), साक्षी शिंदे (६.५ लाख टेक्निमोंट), हर्षल निकम (६.५ लाख-टेक्निमोंट), शंकर कारंडे ( ६.४ लाख टोयो), ऋतूजा बकरे (५ लाख नीलसोफ्ट), दीपांजली कुंभार (तृतीय वर्ष ५.५ लाख ॲटलास कॉपको).
यावेळी अधिष्ठाता डॉ. एस. एम. पिसे, प्रभारी प्राचार्य डॉ. डी. एन. माने, प्रा. आर. सी. शिक्केरी उपस्थित होते. सकाळच्या सत्रात निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा विभागांत ५०० हून अधिक विविध कंपन्यांमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रशस्तिपत्र व टी-शर्ट देऊन सत्कार झाला. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी सर्व विभागांच्या ट्रेनिंग आणि प्लेसमेंट समन्वयकांनी अथक परिश्रम घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT