सावकर - जीवेत शरद: शतम्!
वारणा समूहाचे नेते, जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष, माजी मंत्री आमदार डॉ. विनय कोरे (सावकर) यांच्या वाढदिवसानिमित्त....
---------------------
सावकरांचे व्यक्तिमत्त्वच बहुआयामी आहे. तात्यासाहेबांनी सुरू केलेल्या आदर्श संस्था तितक्याच तोलामोलाने सांभाळणे हे जिकिरीचे काम त्यांनी अल्पवयातच पेलले.
माजी राष्ट्रपती आदरणीय ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा विनय कोरे यांच्यावर आणि वारणेतल्या एकूणच कामावर लोभ होता. त्यांनी आपल्या TARGET ३ BILION पुस्तकात वारणेत सहकारात चाललेल्या कामावर स्वतंत्र चॅप्टर लिहिला आहे. ते म्हणतात, ‘Warana is a remarkable region which, by keeping in mind a socio-economic objective, has been transformed. Warana complex has a message: innovative mission with focus on better technology and sound management, can fulfil socio-economic objectives of creating a prosperous and happy society emanating from the bottom of the pyramid ’’.
खरेतर विनय कोरे आजच्या राजकीय वातावरणाला Mismatch आहेत असे म्हणावे लागेल. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचनं! अशा उक्तीप्रमाणे आचरण असणारी व्यक्ती आजच्या लबाड, ढोंगी, स्वार्थी आणि आपमतलबी राजकारणाच्या वातावरणात फिट बसूच शकत नाही. त्यांचा पिंड समाजकारण आणि संस्थात्मक कार्य यात मनापासून ठेवणारा आहे. निगर्वी, संपूर्णतः जमिनीवर पाय असणारे मनापासून साधे राहणे व आचरण असणारे असे दुर्मिळ व्यक्तिमत्त्व आहे. मृदू बोलणारे, समोरच्याचे शांतपणे ऐकून घेणारे, कार्यकर्त्यांच्या नकळत झालेल्या चुका पोटात घेणारे, क्षमाशील, सर्वाप्रती आदर ठेवणारे असे व्यक्तिमत्त्व विनय कोरे यांना लाभले आहे. एकेकाळी खळखळून मनापासून हसणारे विनय कोरे मात्र कामाच्या ओझ्यात नेहमी गंभीर वाटतात. वारणानगरला त्यांचे स्वतंत्र कार्यालय आहे. असंख्य माणसांच्या गराड्यात ते तिथे शांत चित्ताने बसलेले आढळतात. आमचे मित्र सारंग काळे म्हणतात, ‘कार्यालयाबाहेरचा चपलांचा ढीग आणि एकमेकांना ढकलून गर्दीत त्यांना गाऱ्हाणे सांगणारी माणसे हा त्यांचा ऑक्सिजन आहे. त्यांची कामाची वेळ मात्र दुपारी उशिरा सुरू होते; रात्री उशिरा संपते; अशा व्यक्तीचे वर्णन भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायात ६९ व्या श्लोकात केले आहे.
‘या निशा सर्वभूतानां तस्यां जागर्ति संयमी..’
थोड्या वेगळ्या अर्थाने सर्व जीवांची जी रात्र असते ती आत्मसंयमी मनुष्याच्या जागृतीची वेळ असते. विनय कोरे यांच्याबाबत बरेच अंशी हे खरे आहे. काळवेळेचे भान सर्वसामान्यांना असते; असामान्य त्यापलीकडे असतात. पन्नाशी उलटलेले सावकर राजकीय आणि वैचारिकदृष्ट्या परिपक्व झाले आहेत. त्यांनी आपल्या कर्तृत्वाने वारणेला उतुंग शिखरावर न्यावे हीच आम्हा वारणावासीयांची मनोकामना आहे. परमेश्वराने त्यांना उत्तम आरोग्य आणि उदंड आयुष्य अखंड समाजसेवेसाठी द्यावे ही प्रार्थना.
- मोहन येडूरकर, कार्यकारी संचालक
श्री वारणा सहकारी दूध उत्पादक प्रक्रिया संघ लि. तात्यासाहेब कोरेनगर
पुरवणी संकलन
संजय पाटील, राजेंद्र दळवी, उत्तम महाडिक, वसंत पाटील, शाम पाटील, सागर चौगुले, धनाजी पाटील, संग्राम पाटील, विश्वास साळोखे, अतुल मंडपे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.