कोल्हापूर

केखले येथे शहीद जवान बळवंत नरके यांना अभिवादन

CD

05065

शहीद जवान बळवंत नरके
यांना केखलेमध्ये अभिवादन

वारणानगर, ता. ११ : बांगलादेश सरकारने शहीद बळवंत नरके यांच्या परिवाराला दिलेल्या सन्मानचिन्हाचा, सीमेवर प्राणपणाने लढणाऱ्या सैनिकांच्या कुटुंबाचा गावाने सन्मान राखावा, असे उद्गार मराठा लाईट इन्फंट्रीचे सुभेदार मेजर कॅप्टन गजानन चव्हाण यांनी केखले (ता. पन्हाळा) येथे काढले. केखलेत शहीद जवान बळवंत यशवंत नरके यांच्या ५२ व्या स्मृतिदिनी ग्रामपंचायत कार्यालय आवारातील त्यांच्या पुतळ्यास मराठा इन्फंट्रीचे माजी सुभेदार मेजर कॅप्टन गजानन चव्हाण यांच्यासह कुटुंबीयांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात आले. बळवंत नरके ७ डिसेंबर १९७१ रोजी बांगलादेशाबरोबर झालेल्या युद्धात शहीद झाले होते. यावेळी अनुजा शिंदे, झिनत जमादार, संस्कृती वायदंडे, अथर्व माने, मयुरेश कुंभार व झानेश्वर गिरवे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी सुभेदार लक्ष्मण संभाजी, सुभेदार रावसाहेब नाटकुळे, सुभेदार मारुती वडिंगेकर, सुभेदार शिवाजी जाधव, हवलदार केतन इरळेकर, नायक विक्रम रघूनाथ पाटील, बंधू आनंदराव नरके, सदाशिव नरके, डॉ. प्रताप नरके, सुनील नरके, राजाराम नरके, सरपंच हंबीरराव चौगुले, उपसरपंच उत्तम नरके, पोलिसपाटील कुंडलिक निकम, कुमार व कन्या शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक,यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी माजी सैनिक भिकाजी पाटील, सुरेश निकम यांचा सत्कार झाला. राजू जमदाडे यांनी सूत्रसंचालन, डॉ. प्रताप नरके यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अग्रलेख : सारे काही ‘गॅस’वर

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 11 मार्च 2026

ओझे भयाचे...!

ई-कॉमर्स आणि डिजिटल पेमेंट्सचा वापर

स्पर्धा परीक्षांसाठी कोणती शाखा?

SCROLL FOR NEXT