कोल्हापूर

अभिनेते सयाजी शिंदे यांच्याकडून जोतिबा डोंगरावरील दख्खन केदारण्य प्रकल्पाची प्रशंसा /

CD

05608

अभिनेते सयाजी शिंदे यांच्याकडून
दख्खन केदारण्य प्रकल्पाची प्रशंसा

वारणानगर, ता. ११ : ‘जोतिबा डोंगरावर १० हजार वृक्षांचे रोपण करून डोंगरावर दुर्मिळ वनौषधी, झाडांची निर्मिती होणार आहे. ही बाब कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार
सह्याद्री देवराई सामाजिक संस्थेचे संस्थापक व अभिनेते सयाजी शिंदे यांनी येथे व्यक्त केले.
अभिनेते सयाजी शिंदे यांनी वारणानगर येथे येऊन जनसंपर्क कार्यालयात आमदार डाॅ.विनय कोरे यांची भेट घेऊन चर्चा केली. ५ जूनला जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून आमदार डाॅ.विनय कोरे यांच्या पुढाकारातून जोतिबा विकास प्राधिकरणच्या माध्यमातून जोतिबा डोंगरावर ''दख्खन केदारण्य'' निर्मितीचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत प्रारंभ झाला. यावेळी मंत्री नितीन गडकरी यांनी अभिनेते सयाजी शिंदे यांच्या वृक्षसंवर्धनाबाबतच्या कार्याचा उल्लेख केला होता.
आमदार डाॅ.कोरे यांनी जोतिबा विकास प्राधिकरणासाठी पहिल्या टप्प्यात २५९ कोटी रुपये निधी मंजूर झाला. त्याचा प्रारंभ म्हणून तीस एकर क्षेत्रामध्ये केदारविजय ग्रंथामध्ये नमूद असलेल्या १० हजार वेगवेगळ्या भारतीय झाडांची लागवड करून दुर्मिळ केदारण्य साकारणार असल्याचे सांगितले. यावेळी डॉ. कोरे व अभिनेते शिंदे यांच्यात जोतिबावरील वृक्षारोपणाबाबत चर्चा झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table मध्ये उलथापालथ; राजस्थानचा नेट रन रेट घसरला, CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळा

RR vs DC Live: 'चिमणी उडे, कावळा उडे'! पृथ्वी शॉ याच्यावर आली ही वेळ... सचिन, लारा यांच्यासोबत तुलना व्हायची आज तोच... Video

RR vs DC Live: रवींद्र जडेजाने 'बॅट'उगारली, कुलदीप यादवने दिला धक्का... नेमकं काय घडलं? Viral Video ची चर्चा...

Plane Crash: मोठा अपघात! हिल कंट्रीमध्ये विमान कोसळले; ५ जणांचा मृत्यू, कशी घडली घटना?

AIDS Report : सांगलीत संतापजनक प्रकार! मोतिबिंदू शस्त्रक्रियेसाठी महिला गेली अन् एड्सचा पॉझिटिव्ह रिपोर्ट मिळाला; चुकीचा अहवाल दिल्याने डॉक्टरवर गुन्हा

SCROLL FOR NEXT