कोल्हापूर

''वारणा'' कार्यक्षेत्रातील ५०० एकर उसाचे क्षेत्रावर एआय तंत्रज्ञान वापरणार-- आमदार डाॅ. विनय कोरे

CD

05659

‘वारणा’ ५०० एकरांवर एआय तंत्रज्ञान वापरणार
आमदार डॉ. विनय कोरे; शेतकरी मेळाव्यात घोषणा

सकाळ वृत्तसेवा

वारणानगर, ता. २५ : येथील तात्यासाहेब कोरे वारणा साखर कारखान्यातर्फे कार्यक्षेत्रातील पाच गटांत ५०० एकर उसाच्या क्षेत्रावर एआय तंत्रज्ञान (कृत्रिम बुद्धिमत्ता) वापरून ऊस शेतीचा प्रयोग साकारणार आहे. त्यासाठीचा खर्च वारणा काररखाना करणार असल्याची घोषणा आमदार विनय कोरे यांनी केली.
वारणा साखर कारखाना, इलाईट कृषी सेवा संस्था व वसंतदादा शूगर इन्स्टिट्यूट, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी मेळावा व आधुनिक ऊस शेती व शेतीत कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान वापर विषयावर डॉ. कोरे बोलत होते. वसंतदादा पाटील इन्स्टिट्यूटचे पीक उत्पादक व संरक्षण विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. ए. डी. कडलग, बारामती कृषी विज्ञान केंद्राचे तुषार जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. कोरे म्हणाले, "कृत्रिम बुद्धिमत्तेचे तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्यांनी उसाच्या नव्या क्रांतीकडे वळावे. वारणा कारखान्याचे सहकार्य राहील.’’ डॉ. ए. डी. कडलग म्हणाले, ‘‘शेतात कीड व रोगांचा वाढलेला प्रादुर्भाव, खते व कीटकनाशकांचा अनावश्यक वापर, हवामानबदल, हेक्टरी उत्पादन कमी अशा कारणांनी शेती क्षेत्रांवर परिणाम झाला आहे. माती परीक्षण महत्त्वाचे आहे. ऊस उत्पादकता, साखर उतारा, तोडणी नियोजन अचूक माहिती देणारे तंत्रज्ञान समजून घ्यावे. शाश्वत ऊस उत्पादन वाढीसाठी एआय तंत्रज्ञानाचे महत्त्व समजून घ्यावे.’’
तुषार जाधव म्हणाले, ‘‘सॅटेलाईट प्रणाली, स्वयंचलित हवामान केंद्र, फवारणी, निरीक्षण ड्रोन, उसाचे नियोजन यासह अन्य तंत्रज्ञान विकसित केले तर जमिनीची सुपीकता अबाधित राहील. शेतकऱ्यांसह साखर कारखान्यांनीही नवे तंत्रज्ञान विकसित करावे.’’ इलाईट कृषी सेवा संस्थेच्या नवीन ड्रोनचे उद्घाटन आमदार कोरे यांच्या हस्ते झाले. ते सवलतीत सभासद, शेतकऱ्यांना देण्यात येईल. ऊसविकास अधिकारी सुभाष करडे यांनी स्वागत केले. यावेळी उपाध्यक्ष प्रतापराव पाटील, कार्यकारी संचालक एस. आर.भगत, वारणा दूध संघाचे उपाध्यक्ष एच. आर. जाधव, इलाईट कृषी संस्थेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील, संचालक सुभाष पाटील, श्रीनिवास डोईजड, संचालक, मुख्य शेती अधिकारी प्रमोद पाटील यांच्यासह वारणा उद्योग समूहातील पदाधिकारी उपस्थित होते. प्रा. एन. आर. चोपडे यांनी सूत्रसंचालन, विठ्ठल पाटील यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: गॅसटंचाईमुळे ठाण्यातील ६० टक्के हॉटेल्स बंद, व्यावसायिकांचे चुलीवर स्वयंपाक करत आंदोलन

Pune Traffic: महाराष्ट्र केसरी स्पर्धेमुळे उद्यापासून पुण्याच्या वाहतुकीत बदल; लोणीकंद-खराडी मार्गावर अवजड वाहनांना बंदी

Maharashtra Heatwave: अलर्ट! राज्यात जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता, उष्णतेची लाट ओसरली

Latest Marathi News Live Update : पोलिस भरती प्रक्रियेत उमेदवारांनी घातला गोंधळ

Pune Crime : सिंहगड रस्त्यावरील तरुणाच्या खून प्रकरणी तीन अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT