कोल्हापूर

वारणा बझारची वार्षिक १६७ कोटींची विक्री : अध्यक्षा शुभलक्ष्मी कोरे /

CD

06615
वारणा बझारची वार्षिक
१६७ कोटींची विक्री

शुभलक्ष्मी कोरे ः ४९ वा वर्धापन दिन साजरा


वारणानगर, ता. २ : येथील वारणा बझार ग्राहक संस्थेने दोन डिपार्टमेंटल स्टोअर्स पन्नास शाखांच्या माध्यमातून २०२५-२६ या वार्षिक कालावधीत १६७ कोटी रुपयांची विक्रमी विक्री झाल्याची माहिती संस्थाध्यक्षा शुभलक्ष्मी कोरे यांनी दिली. वारणा बझारचा ४९ व्या वर्धापन दिनानिमित्त त्या बोलत होत्या बझारच्या प्रधान कार्यालयात झालेल्या कार्यक्रमास ज्येष्ठ संचालिका देवकीदेवी पाटील यांची उपस्थिती होती.
अध्यक्षा कोरे म्हणाल्या, ‘‘वारणा समूहाचे संस्थापक सहकारमहर्षी स्व. तात्यासाहेब कोरे यांनी देशातील पहिले सहकारातील ग्राहक भांडार वारणा बझारच्या माध्यमातून सुरू केले. कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात शाखांचा विस्तार केला. आमदार डॉ. विनय कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी बझारच्या वार्षिक विक्रीचा टप्पा वाढत आहे. अनेक शाखांना कार्पोरेट लूक दिला आहे. स्पर्धात्मक युगात क्वॉलिटीची सेवा दिली. डिस्काउंटवरील माल तसेच एकावर एक फ्री वस्तू याची वन डे ऑफर मालाचीची जाहिरात गावातील बाजारात केल्यामुळे विक्री वृद्धीला बळ मिळाले. संचालक व अधिकारी व कर्मचारी यांच्या संयुक्त प्रयत्नाने बझारची प्रगती होत आहे. यावेळी वारणा दूध संघाचे अध्यक्ष एच. आर. जाधव, कार्यकारी संचालक सुधीर कामेरीकर, कारखान्याचे कार्यकारी संचालक शहाजी भगत, विजयकुमार कोले, चीफ अकौंटंट जगन्नाथ चरापले आदींनी भेट दिली. यावेळी बझारचे उपाध्यक्ष सुभाष देसाई, संचालक विश्वनाथ पाटील, अनिल पाटील, मोहन आजमने, राजाभाऊ गुरव, संचालिका बबुताई महापुरे, शरद महाजन, पर्चेस मॅनेजर महेश आवटी, अकौंटस मॅनेजर संदीप पाटील, एचआर मॅनेजर तानाजी ढेरे, सर्जेराव पाटील, हणमंत दाभाडे, रघुनाथ मलगुंडे उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Paper Leak : नीट पेपरफुटी प्रकरणात आणखी एक तज्ज्ञ प्राध्यापिका रडारवर; मनीषा हवालदारचे सीबीआय चौकशीत धक्कादायक खुलासे !

Beed Crime News : बीड पुन्हा हादरले! सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुनरावृत्ती; उमेश दळवीची निघृण हत्या, बेदम मारहाणीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल

Latest Marathi News Live Update : राज्यातील काही जिल्ह्यांना आज पावसाचा इशारा

दिवाळीनंतर नाही तर दिवाळीपूर्वीच होणार रणबीर कपूरचा रामायण सिनेमा रिलीज !

Pune News: पुण्यात आज मेघगर्जनेसह पावसाची शक्यता; उकाड्यातून दिलासा; पुणेकरांना आज पावसाची साथ; हवामान विभागाचा अंदाज

SCROLL FOR NEXT