लोगो ः शिवसंदेश व्याख्यानमाला
06621
आदर्श व्यक्तिमत्त्व कसे असावे
हे शिवचरित्रातून शिकावे : माळकर
शिवचरित्रावर गुंफले तिसरे पुष्प
वारणानगर, ता. ४ : ‘‘छत्रपती शिवाजी महाराज केवळ पराक्रमी योद्धा नव्हते, तर ते आदर्श राज्यकर्ते, दूरदर्शी नेता आणि लोकहितकारी राजा होते. त्यांच्या चरित्रातून अनेक जीवनमूल्ये शिकायला मिळतात. आदर्श व्यक्तिमत्त्व कसे असावे हे शिवचरित्रातून शिकावे,’’ असे आवाहन प्रज्ञा माळकर (शिरोळ) यांनी बहिरेवाडी (ता. पन्हाळा) येथे केले.
बहिरेवाडी येथील महात्मा वाचनालयाच्या शिवसंदेश व्याख्यानमालेत तिसरे पुष्प ‘शिवचरित्रातून आम्ही काय शिकावे’ विषयावर गुंफताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी युवा उद्योजक विशाल जाधव होते.
प्रज्ञा माळकर म्हणाल्या, ‘‘शिवाजी महाराजांनी स्वराज्य संकल्पना रुजवली. त्यांनी परकीय सत्तेविरुद्ध लढा देऊन स्वतःचे राज्य निर्माण केले. आपल्या हक्कांसाठी लढणे आवश्यक आहे. स्वाभिमान आणि स्वातंत्र्य यांना महत्त्व द्यावे. धैर्य आणि चिकाटीच्या जोरावर त्यांनी लहान वयातच अनेक संकटांना सामोरे जाऊन पराक्रम गाजवला. शिवाजी महाराजांनी स्त्रियांचा सन्मान राखला. स्त्री संस्कृतीची ओळख आहे. प्रत्येकाने स्त्रियांचा आदर करावा, हे त्यांनी कृतीतून शिकवले. विश्वास आणि सहकार्य यामुळे यश मिळते. समाजात एकता आणि शांतता राखणे, नेहमी न्यायाने आणि प्रामाणिकपणे वागावे. चुकीच्या गोष्टींना विरोध करावा. छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र आदर्श जीवन जगण्याची प्रेरणा देते. सर्वांनी त्यांच्या शिकवणीचे पालन करून चांगले नागरिक बनण्याचा प्रयत्न करा.’’ यावेळी श्रीकांत माळकर, चंद्रकांत गिरी, प्रा. पी. बी. बंडगर, एस. बी. निकम उपस्थित होते. वाचनालयाचे अध्यक्ष ग्रंथमित्र प्रा. के. जी. जाधव यांनी स्वागत केले. डॉ. युवराज भोसले यांनी आभार मानले. शिवराज जाधव यांनी सूत्रसंचालन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.