कोल्हापूर

गांजा

CD

03367
...
तीन किलो गांजासह दोघांना अटक

राधानगरी पोलिसांची पंढरपूर येथे कारवाई

राशिवडे बुद्रुक, ता. २९ : राधानगरी तालुक्यात दोन ठिकाणच्या गांजा छापा प्रकरणाची येथील पोलिसांनी सखोल तपास केल्याने हे जाळे कर्नाटकमार्गे पंढरपुरापर्यंत असल्याचे पुढे आले आहे. यातील दोन मुख्य सूत्रधारांना तीन किलो ६८७ ग्रॅम गांजासह राधानगरी पोलिसांनी पंढरपूर येथून अटक केली आहे. वैभव मच्छींद्र चव्हाण व प्रविण नामदेव चव्हाण अशी त्यांची नावे आहेत. त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी मिळाली आहे.
राधानगरीच्या पोलिस पथकाने मालवेजवळ गांजा विक्री करणाऱ्या टोळक्यावर छापा टाकून गांजासह मोबाईल, मोटारसायकली जप्त केल्या होत्या. पाठोपाठ पुंगाव येथून एकाला पकडले होते. यामुळे गांजा प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याचा संशय येथील पोलिस निरीक्षक स्वाती गायकवाड यांना आला. त्या दिशेने त्यांनी तपास सुरू केल्यानंतर गांजा विक्रीचे कनेक्शन कर्नाटकांपर्यत पोहोचल्याचे निदर्शनास आले. तिथून ते पंढरपुरापर्यत पोहोचल्याचे स्पष्ट झाले.
या प्रकरणातील प्रमुख वैभव चव्हाण (वय २७, रा.बावडा ता. इंदापूर, सध्या रा.पंढरपूर ) व प्रवीण चव्हाण (वय ३६, रा.सरवडे. सध्या रा. निपाणी) यांना अटक केली आहे. प्रवीण हा वैभवकडून गांजा आणून तालुक्यामध्ये विक्री करत होता. संशयितांना न्यायालयामध्ये हजर केले असता दोन जूनपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Property Tax: पुणे महानगरपालिकेत भाजपने करमाफीचा शब्द फिरवला; ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना टॅक्स माफी नाही

Gas Cylinder Shortage : छत्रपती संभाजीनगर तालुक्यात ग्रामीण भागात गॅस टंचाई; लग्नसमारंभ व हॉटेल व्यवसाय अडचणीत, अनेक हाँटेल गॅसअभावी बंद

Latest Marathi News Live Update: PNG गॅस आणि पेट्रोलियम उत्पादनांच्या स्थितीबाबत उच्चस्तरीय आढावा बैठकीचे आयोजन

Theur Fraud News : लँड डेव्हलपरला मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून १२ कोटींचा घातला गंडा

Pachod News : केकत जळगाव येथे कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने संपविले जीवन

SCROLL FOR NEXT