03450
...
ट्रक - दुचाकीच्या अपघातात
ठिकपुर्लीत एक जण जागीच ठार
राशिवडे बुद्रुक ता. १८ : ठिकपुर्ली (ता. राधानगरी) येथे ट्रक आणि दुचाकीच्या अपघातात एक जण जागीच ठार झाले. चंद्रकांत गुंडू पाटील (वय ६३, रा. राधानगरी) असे त्यांचे नाव आहे. आज सायंकाळी साडेचारच्या सुमारास ही घटना घडली.
याबाबतची अधिक माहिती अशी, राधानगरी येथे दूध संस्थेचे सचिव असलेले श्री. पाटील हे चक्रेश्वरवाडीकडून शेळेवाडीकडे आपल्या मित्राला भेटण्यासाठी येत होते. त्याचवेळी ठिकपुर्लीकडून पोल्ट्रीचे खाद्य घेऊन ट्रक (एम. एच. ०९ बीसी २५१२) चक्रेश्वरवाडीकडे जात होता. येथील कालव्याच्या अलिकडे शंभर मीटरवर गल्लीतच समोरून आलेल्या ट्रकची धडक बसून त्यांचा डावा पाय चाकाखाली सापडला. त्याचवेळी त्यांचे डोके बाजूच्या दगडावर आपटल्याने ते जागीच ठार झाले. याची नोंद पोलिस ठाण्यात झाली आहे. त्यांच्या मागे पत्नी, तीन मुले, सुना असा परिवार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.