कोल्हापूर

बॉक्साईट चोरी

CD

04322

दुर्गमानवाड, तळगाव परिसरात
बॉक्साईटची राजरोस तस्करी
राशिवडे बुद्रुक, ता. २९ : राधानगरी तालुक्यातील दुर्गमानवाड, तळगाव परिसरातील डोंगरांमध्ये विनापरवाना बॉक्साईटची तस्करी राजरोस सुरूच आहे. तळगावच्या डोंगरकुशीत असलेल्या पाझर तलावाला लागून व चाफेवाडी परिसरात मोठ्या प्रमाणात बॉक्साइट उत्खनन सुरू असल्याचे निदर्शनास येत आहे. महसूल खात्याचेही दुर्लक्ष असल्याचा सुर शेतकऱ्यांकडून निघत आहे.
दुर्गमानवाड परिसरातील चाफेवाडी, धुमाळवाडी परिसरात असलेल्या पडीक जमिनीमधून जेसीबीद्वारे उत्खनन करून बॉक्साइट रातोरात लंपास करणारी राधानगरी व भुदरगड परिसरातील टोळी कार्यरत आहे. दुर्गमानवाड तलाठी सज्जात जेसीबीचा आवाज ऐकू येईल इतक्या अंतरावर उत्खनन सुरू आहे. पाझर तलावाच्या भिंतीवरूनच गेलेल्या मार्गाने पुढे गेल्यास येथे ठिकठिकाणी परिसर खणलेला आहे. ट्रकचे माग दिसतात. येथे रात्री उत्खनन केले जाते. हे ट्रक महसूल खात्याच्या तलाठी आणि मंडल अधिकारी कार्यालयाच्या दारावरून जातात तरीही त्याचा लोकांना पत्ता नाही. याबाबत तहसीलदार अनिता देशमुख यांना विचारले असता सध्या निवडणूक प्रशिक्षणात सगळे अडकून असल्याने चौकशी करणे अडचणीची ठरत असल्याचे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Siya Goyal: सियाने माध्यमांना खरंच मिडल फिंगर दाखवलं होतं का? पुरावा देत वडिलांनी दिलं स्पष्टीकरण; संपूर्ण घटनाच सांगितली!

मोठी बातमी! ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी पंतप्रधान मोदींना जीवे मारण्याची धमकी, मेलबर्न पोलिसांकडून तपास

Pune Civic Negligence: मुंढव्यात निकृष्ट सांडपाणी कामामुळे रस्त्यात खोल खड्डा; ट्रक अडकला, महापालिकेवर नागरिकांची झोड

IND vs ENG, 2nd T20I: अभिषेक-ईशानची फिफ्टी हुकली, पण तिलक वर्माची दमदार फिनिशिंग, भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध १९० धावा पार

Pune Rain Alert: पुण्यात सलग पावसाची रिपरिप; घाट परिसरासाठी पुढील दोन दिवस ‘रेड’ अलर्ट, प्रशासनाचे नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

SCROLL FOR NEXT