कोल्हापूर

भोगावती तोडणी नियोजन

CD

भोगावती साखर कारखान्याचे
६ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट
राशिवडे बुद्रुक, ता. ११ : भोगावती सहकारी साखर कारखान्याचा तोडणी कार्यक्रम शेतकऱ्यांना त्रासक ठरू लागल्याने पुढील हंगामात शेतकरी हिताचे धोरण कारखान्याने ठरवले आहे. आगामी हंगामात ६ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले असून त्या दृष्टीने ऊस तोडणी वाहतुकीसाठी अभिनव मोहीम राबवली आहे. ऊसतोडणी यंत्रणेत आमूलाग्र बदल करणार असल्याची माहिती अध्यक्ष शिवाजीराव पाटील व उपाध्यक्ष राजाराम कवडे यांनी पत्रकार बैठकीत दिली.
साखर कारखान्यांना ऊसतोडणी मजुरांच्या टंचाईमुळे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे तोडणी ओढणी यंत्रणा विस्कळीत होत आहे. हा प्रश्न सोडवून ऊस उत्पादकांचा ऊस पाळी पत्रकाप्रमाणे वेळेवर तोडण्यासाठी कारखान्यां ने तोडणी वाहतूक संघटनेशी चर्चा करून नवीन योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक वर्षे कारखाना वाहनांना आगाऊ उचल देत नाही. मात्र कारखाना आगामी हंगामात काही अंशी व्याजाचा भार उचलणार आहे, असे पाटील व कवडे यांनी सांगितले.
योजनेनुसार प्रत्येक गटाचे नियोजन स्वतंत्रपणे केले आहे. वाहनांची हंगामातील उपस्थिती आणि ओढलेले टनेज यानुसार हे नियोजन केले आहे. त्यामुळे किमान आठशे वाहनांचे करार होतील. त्याचबरोबर सहा लाख टनांचे गाळप उद्दिष्टही पूर्ण होईल, असे त्यांनी सांगितले. कारखान्याने ऊसतोडणी यंत्रासाठीही योजना राबवली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी संचालक धिरज डोंगळे, शिवाजीराव कारंडे, पांडुरंग पाटील , अभिजित पाटील, तानाजी काटकर, कार्यकारी संचालक संजय पाटील, सचिव उदय मोरे, ऊस वाहतूक संघटनेचे अध्यक्ष आर. वाय. पाटील व पदाधिकारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Drought Criteria : दुष्काळ निकषांची पडताळणी सुरू बारा ऑक्टोबरपूर्वी घोषणा शक्य

Gokul Election 2026 : 'गोकुळ'चं राजकारण तापलं! मंत्री मुश्रीफ, विनय कोरेंनी नियोजित दौरे रद्द करून गाठली मुंबई; नेत्यांची जोरात फिल्डिंग, राजकीय चर्चांना उधाण

Latest Marathi News Update : महाराष्ट्रात धो धो पाऊस, हवामान तज्ज्ञांच्या इशाऱ्यानंतर जोरदार पाऊस

Aaditya Thackeray Disha Salian case : आदित्य ठाकरेंच्या अडचणीत वाढ? दिशा सालियानचे वडील सतीश सालियान अब्रुनुकसानीची नोटीस घेऊन मातोश्रीवर जाणार

PM Kisan e-KYC : शेतकऱ्यांनो लक्ष द्या! 'पीएम किसान'साठी 31 ऑक्टोबरची मुदत; ई-केवायसी, भूमी अभिलेख नोंद पूर्ण करणे आवश्यक, ताबडतोब करा 'हे' काम

SCROLL FOR NEXT