कोल्हापूर

पर्यटन आराखडा

CD

राधानगरी इको पर्यटन क्षेत्राचा
विकास आराखडा काम जोमाने
राधानगरी, ता. ३१ : राधानगरी अभयारण्य आणि धरण व त्याच्या सभोवतालच्या क्षेत्राचा इको-पर्यटन क्षेत्र म्हणून विकास करण्यासाठी नियुक्त विशेष नियोजन प्राधिकरणाने एकात्मिक पर्यटन विकास आराखडा तयार करण्याचे काम जोमाने सुरू केले आहे.
अधिसूचित विशेष नियोजन प्राधिकरण क्षेत्राच्या हद्दीत ८४ गावे समाविष्ट आहेत. या क्षेत्राचा भू वापर नकाशा तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. आगामी एक-दोन महिन्यांत नकाशा प्रकाशित केला जाणार आहे. नकाशा प्रकाशित झाल्यानंतर प्राधिकरणाकडून प्रारूप विकास आराखडा तयार करण्याचे काम सुरू होणार आहे. राज्य शासनाने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून २०२३ मध्ये नियुक्ती केली आहे. तब्बल वर्षभरानंतर पहिल्या टप्प्यातील आवश्यक सर्वेक्षण होऊन, भू वापर नकाशा तयार करण्याच्या कामाने गती घेतली. राधानगरी अभयारण्य व धरणांच्या क्षेत्रात पर्यटन विकासाच्या दृष्टीने मोठा वाव आहे. यामुळे वन्यजीव, वृक्षसंपदा जतन, संवर्धन आणि संरक्षण स्थानिकांसाठी शाश्वत आणि पर्यावरणपूरक विकास साधणे. पर्यटन क्षमतेचा उपयोग करून, त्याच्या वाढीला चालना देणे. आदी बाबींचा प्रस्तावित पर्यटन विकास आराखड्यात समावेश असेल. लवकरच भू वापर नकाशा आणि प्रारूप विकास आराखडा तयार होऊन हरकती व सूचनांसाठी प्रसिद्ध करण्याचे प्राधिकरणाकडून सूचित झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! अंशत: अनुदानित शाळांवरील शिक्षकांचे १०० टक्के अनुदानित शाळेतील पूर्णवेळ शिक्षकांच्या जागेवर होणार समायोजन; आदेश नेमके काय? वाचा...

Indian girl in America: वडगावच्‍या नीलमची १४ महिन्यांची झुंज अखेर व्‍यर्थ; वडिलांचा हंबरडा...अपूर्ण राहिली भेट, अमेरिकेत नेमकं काय घडलं?

आजचे राशिभविष्य - 08 एप्रिल 2026

Daily Panchang 8 April 2026 : शुभ मुहूर्त, राहू काळ आणि दिनविशेष जाणून घ्या

Beetroot Rajma Pinwheels: सकाळी नाश्त्याला बनवा प्रोटिनयुक्त अन् चवीला मस्त ‘बीटरूट राजमा पिनव्हील्स’, लगेच नोट करा ही सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT