Kharif Season esakal
कोल्हापूर

Kharif Season : राधानगरीत 15 हजार हेक्टर क्षेत्रावर यंदा खरीप लागवड

तालुक्यात उसापाठोपाठ खरीप हंगामातील भात पीक क्षेत्र सर्वाधिक आहे.

सकाळ डिजिटल टीम

खरीप हंगामपूर्व शेती मशागतीची कामे पूर्ण झाली असून, पूर्व भागातील काही क्षेत्रात धूळवाफ पेरणी व भात टोकनणी झाली आहे.

राधानगरी : राधानगरी तालुक्यात यंदाच्या खरीप हंगामात १४ हजार ९५६ हेक्टर क्षेत्रात खरीप पिकांची लागवड होणार आहे. तालुक्यात उसापाठोपाठ खरीप हंगामातील भात पीक क्षेत्र सर्वाधिक आहे.

खरीप हंगामपूर्व शेती मशागतीची कामे पूर्ण झाली असून, पूर्व भागातील काही क्षेत्रात धूळवाफ पेरणी व भात टोकनणी झाली आहे. तालुक्यात पूर्व भागात टोकण, तर पश्चिम भागात रोप लावण पद्धतीने भात पीक घेतले जाते. मॉन्सूनची चाहूल लागल्याने सध्या पेरणीची पूर्वतयारी सुरू आहे. वळीव पाऊस पेरणीस उपयुक्त ठरला आहे.

पारंपरिक भात बियाण्यांबरोबरच संकरित बियाणे वापरावरही शेतकऱ्यांचा भर आहे.
यंदाच्या खरीप हंगामात भात १२,१५०, भुईमूग १२१०, नागली १७७०, सोयाबीन ४०, तूर ४५ आणि उडीद ५० हेक्टर असे पीकवार उद्दिष्ट कृषी विभागाने निश्चित केले आहे.

खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीनंतर कृषी विभागाने खरीप हंगामासाठी सर्व सज्जता केली आहे. खते, बियाण्यांची पुरेशी उपलब्धता आहे. आवश्यक बियाणे, खतांचा तुटवडा भासणार नाही, याची विशेष दक्षता घेतली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार मॉन्सून वेळेत सुरू होणार असल्याने यंदाचा खरीप हंगाम शेतकऱ्यांसाठी समाधानकारक ठरेल.

-अरुण मगदूम, कृषी अधिकारी, पंचायत समिती राधानगरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Election Commission Controversy : 'ज्ञानेश कुमारांनी लोकसभेसह यापूर्वीच्या अनेक विधानसभा निवडणुकांत हेराफेरी केली'; राहुल गांधींचा गंभीर आरोप, मोदी-शाहांवरही निशाणा

Mumbai Rain: परतीचा पाऊस मुंबईला झोडपणार! 'या' भागात वादळी पावसाची शक्यता, हवामान विभागाचा नवा अंदाज

2007 T20 World Cup जिंकणाऱ्या भारतीय खेळाडूंना BCCI ने किती रुपये बक्षीस दिलेलं; युवराजलाही ६ सिक्ससाठी मिळालेलं खास बक्षीस

Latest Marathi News Live Update : मतचोरी करून खासदार झालेले कायदा बनवतायत : राहुल गांधी

Heart Health: हृदय निरोगी ठेवायचंय? कार्डिओलॉजिस्ट सांगतात २४ तासांचा सोपा रुटीन; काय खावं, किती व्यायाम करावा? सगळंच जाणून घ्या

SCROLL FOR NEXT