कोल्हापूर

अभयारण्य बंद

CD

राधानगरी-दाजीपूर वन्यजीव
अभयारण्य पर्यटकांसाठी बंद

राधानगरी ता. ८ : राधानगरी-दाजीपूर वन्यजीव अभयारण्य पर्यटकांसाठी बंद झाल्याने यंदाच्या उन्हाळी पर्यटन हंगामाची सांगता झाली आहे.
नोव्हेंबर ते मे अखेरीपर्यंतच्या पर्यटन हंगामात अभयारण्य क्षेत्रात येणाऱ्या पर्यटकांची संख्या वर्षागणिक वाढती आहे. पावसाळ्यातही अभयारण्य क्षेत्रातील राऊतवाडी धबधबास्थळी वर्षा पर्यटनासाठी जुलै ते सप्टेंबर काळात पर्यटकांचा ओघ वाढता आहे. यंदा वन्यजीव विभागाकडील माहितीनुसार अभयारण्य क्षेत्रात येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत गतवर्षीपेक्षा दुपटीने वाढ झाली आहे. उन्हाळी आणि पावसाळी पर्यटन हंगामात राधानगरी-दाजीपुरात वर्षातील एक-दोन महिन्यांचा अपवाद वगळता कायम पर्यटकांचा राबता राहतो. यातून स्थानिकांना पर्यटनातून रोजगाराचे साधन निर्माण झाले आहे. इको-पर्यटन विकासासाठी स्थापन झालेल्या विशेष नियोजन प्राधिकरणाकडून लवकरच एकात्मिक पर्यटन विकास आराखडा तयार होणार आहे. त्यानंतर राधानगरी-दाजीपूरच्या पर्यटन विकासाचा आलेख वाढताच राहील. अभयारण्य क्षेत्रातील पर्यटन स्थळांच्या विकास, जंगल सफारी वाहन सुविधा, अभयारण्यांतर्गत रस्त्याची विशेष सुधारणा, तंबू निवास आणि होम स्टे सुविधा आदी बाबी पर्यटन वाढीसाठी उपयुक्त ठरल्या आहेत. राऊतवाडी धबधबा क्षेत्राच्या स्थळी केलेल्या सुधारणेमुळे ते सुरक्षित वर्षा पर्यटनस्थळ बनले आहे. पावसाळ्यात राधानगरी-दाजीपूर अभयारण्य जून ते ऑक्टोबर काळात पर्यटकांसाठी बंद राहते. पावसाळा संपल्यानंतर नोव्हेंबरमध्ये पुन्हा अभयारण्य पर्यटकांसाठी खुले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT