कोल्हापूर

विधानसभेला उचला उमेदवार नको

CD

विधानसभेला उचला उमेदवार नको

राधानगरी तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांची मागणी

सकाळ वृत्तसेवा
राशिवडे बुद्रुक, ता. ८ : ‘काँग्रेसने विधानसभा निवडणुकीत आयात केलेला किंवा उचला उमेदवार दिला तर प्रामाणिक कार्यकर्ता ते स्वीकारणार नाही. असे न करता पक्षश्रेष्ठींनी पक्षाच्या कार्यकर्त्यालाच उमेदवारी द्यावी,’ अशी मागणी भोगावती येथे झालेल्या राधानगरी तालुक्यातील काँग्रेसच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत करण्यात आली. अध्यक्षस्थानी कृष्णराव किरुळकर होते.
गोकुळचे माजी संचालक पी. डी. धुंदरे म्हणाले, ‘पक्षाचे नेते पी. एन. पाटील यांच्या निधनामुळे सर्वांचेच मोठे नुकसान झाले असून, त्यांच्या पश्चात तालुक्यातील पक्ष संघटना एकजुटीने मजबूत ठेवली पाहिजे.’
कृष्णराव किरूळकर म्हणाले, ‘तालुक्यातील काँग्रेस पक्ष दुसऱ्यांच्या वळचणीला बांधल्यामुळे पक्षाचे नुकसान झाले आहे. जिल्हा पातळीवरील नेत्यांनी तालुक्यातील सर्वांना विचारात घेतल्याशिवाय कोणताही निर्णय परस्पर घेऊ नये.’
गोकुळचे संचालक आर. के . मोरे म्हणाले, ‘नेत्यांमध्ये एकी नसल्यामुळे तालुक्यावर सातत्याने अन्याय झाला. आता काँग्रेस कार्यकर्त्यांना गृहीत धरू नये. लोकसभा निवडणुकीत श्रीमंत शाहू छत्रपती महाराजांना मिळालेल्या मताधिक्यात किमान ३० हजारांचे मताधिक्य काँग्रेसचे आहे, त्यामुळे काँग्रेस पक्ष कोणाच्याही दावणीला बांधू नये.’ सुधाकर साळोखे यांनी महिला जिल्हाध्यक्ष सुप्रिया साळोखे काँग्रेसकडून विधानसभा लढवतील, असे सांगितले.
यावेळी कृष्णराव किरुळकर, पी. डी. धुंदरे, आर. के. मोरे यांनी तालुक्याचे नेतृत्व करावे, असे अनेक वक्त्यांनी सुचवले. यावेळी संजयसिंह पाटील, विश्वनाथ पाटील, धीरज डोंगळे, उत्तम पाटील, भिवाजी पाटील, बंडोपंत वाडकर, प्रभाकर पाटील यांची भाषणे झाली. भोगावतीचे संचालक रवींद्र पाटील, अभिजित पाटील, बिद्रीचे संचालक डी. एस. पाटील, एम. आर. पाटील , जयवंतराव कांबळे, बी. आर. पाटील, एल. एस. पाटील, पी. डी. चौगले आदींसह तालुक्यातील कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी पी. एन. पाटील यांच्या पश्चात राहुल पाटील यांच्या पाठीशी राहण्याचा निर्णय झाला.
...............

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India ODI Squad: भारताचा वनडे संघ जाहीर! इंग्लंड दौऱ्यातून शतक करणाऱ्या जैस्वालला डच्चू, तर विराट कोहलीबाबत काय झाला निर्णय?

Badlapur: मध्यरात्री २ वाजता २५०च्या वेगात BMWचा अपघात, दोघांचा मृत्यू; अवयव रस्त्यावर अर्धा किमीपर्यंत विखुरले, गाडीच्या इंजिनचे तुकडे

Central Railway: कर्मचाऱ्यांचे हाल होणार! मध्य रेल्वेवर 2 दिवस विशेष ब्लॉक, काही लोकल रद्द; वेळापत्रकातही बदल, वाचा सविस्तर

पुण्यात गोळीबाराचा थरार! गुन्हेगाराला पकडायला गेल्यावर अचानक गोळीबार, पोलिसांनीही दिलं प्रत्युत्तर, काय घडलं?

Operation Tiger: महाराष्ट्रात पालटू शकतो गेम? आमदार फोडले पण उद्धव ठाकरेंचे खासदार फोडणे शिंदेंसाठी सोपे नाही; Inside Story काय?

SCROLL FOR NEXT