Landslide Ghat esakal
कोल्हापूर

Radhanagari : भूस्खलनप्रवण भागातील नागरिकांनी सावध राहावे; राधानगरी प्रांताधिकारी, तहसीलदारांचे आवाहन

पाच वर्षांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमध्ये तालुक्यातील अनेक डोंगर भाग खचले होते.

राजू पाटील राशिवडे

तालुक्याला गेल्या चार दिवसांत पावसाने झोडपायला सुरुवात केली आहे. तुळशी परिसरात गेल्या २४ तासांत २०० मि.मी. चा टप्पा पार केला, तर काळम्मावाडी परिसरात शंभरी ओलांडली आहे.

राशिवडे बुद्रुक : ‘गेल्या चार दिवसांत राधानगरी तालुक्यात पावसाने जोर धरला आहे. गेल्या २४ तासांत सर्वाधिक तुळशी धरण क्षेत्रात पाऊस झाला. पाच वर्षांपूर्वी याच परिसरामध्ये भूस्खलनामुळे मोठी हानी झाली होती. त्यामुळे तुळशी-धामणीसह भोगावती क्षेत्रातील भूस्खलनप्रवण क्षेत्रात वास्तव्य करणाऱ्या नागरिकांनी सावधानता बाळगावी,’ असे आवाहन प्रांताधिकारी सचिन बनसोडे आणि तहसीलदार अनिता देशमुख यांनी केले.

पाच वर्षांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमध्ये तालुक्यातील अनेक डोंगर भाग खचले होते. धामणी परिसरातील कुपलेवाडी येथे झालेल्या भूस्खलनामध्ये एका कुटुंबातील दाम्पत्य व तीन जनावरे गाडली होती. शिरगावमध्ये एक महिला गंभीर जखमी झाली होती. अनेक ठिकाणी डोंगराच्या दरडी कोसळल्या होत्या. राधानगरीशेजारच्या (Radhanagari) पाटपन्हाळा भागातील डोंगर आणि राज्यमार्गावरील गैबी घाटात सुमारे अर्धा किलोमीटरचा डोंगर खचून रस्त्यावर आला होता. बऱ्याच ठिकाणी डोंगरांना भेगा पडल्या. भविष्यात अतिवृष्टी झाल्यास या भेगांमध्ये पाणी शिरून भूस्खलनाचा धोका असल्याचा अहवालही भूगर्भ शास्त्रज्ञांनी दिला आहे. भूस्तर हाललेला हा परिसर मोठ्या प्रमाणात पाणी घुसल्यानंतर जागा सोडतो, त्यामुळे अशा ठिकाणच्या वास्तव्यास असलेल्या नागरिकांनी दक्ष राहण्याचा अहवालही दिला आहे.

तालुक्याला गेल्या चार दिवसांत पावसाने झोडपायला सुरुवात केली आहे. तुळशी परिसरात गेल्या २४ तासांत २०० मि.मी. चा टप्पा पार केला, तर काळम्मावाडी परिसरात शंभरी ओलांडली आहे. अशा परिस्थितीत पाऊस वाढत राहिल्यास भूस्खलन होण्याची स्थिती गंभीर असते. त्यामुळे भूस्खलनप्रवण क्षेत्रातील कुपलेवाडी, म्हासुर्ली, शिरगाव, पाटपन्हाळा, आडोली, वाकीघोल या गावांना दक्षतेचा इशारा दिला आहे. यासाठी संबंधित ग्रामपंचायतींना प्रांताधिकारी बनसोडे व तहसीलदार देशमुख यांनी सुरक्षित राहण्याबाबत नोटिसा बजावल्या आहेत.

भूस्खलनापूर्वीचे निसर्गातील बदल

भूस्खलनापूर्वी किमान काही तास आधी त्या परिसरातील झाडे, विद्युत खांब कलतात.
- नव्याने ओघळ सुरू होतात.
- पूर्वीच्या पाण्याच्या ओघळांमधून पाण्याची गती अचानक वाढते.
- पाणी गढूळ यायला सुरुवात होते.
- ओढ्या-नाल्यांचे झरे अचानक गरम वाटू लागतात. घराच्या पायातून किंवा घरातून उघळ फुटतात.
- प्रमाणापेक्षा अधिक प्रवाह वाढतात.
- पक्षी, वन्यप्राणी बिथरतात. त्यांच्या हालचाली जाणवू लागतात.
- गोठ्यातील गाई-म्हशींच्या वर्तनात विलक्षण बदल घडतात.
................
संभाव्य भूस्खलनप्रवण गावे

कुपलेवाडी, म्हासुर्ली, शिरगाव, पाटपन्हाळा, आडोली, वाकीघोल

दृष्टिक्षेपात


- पाच वर्षांपूर्वी कुपलेवाडीत भूस्खलन
- एकाच कुटुंबातील दाम्पत्य व तीन जनावरे गाडली
- शिरगावमध्ये एक महिला गंभीर जखमी
- अनेक ठिकाणी डोंगराच्या दरडी कोसळल्या
- पाटपन्हाळा, गैबी घाटात डोंगर खचून भेगा पडल्या

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT