कोल्हापूर

अपघात

CD

दुचाकीस्वाराला चुकवताना
मोटार झाडाच्या बुंध्याला धडकली

राधानगरी-गैबी तिट्टा दरम्यान अपघात; तिघे जखमी

सकाळ वृत्तसेवा
राधानगरी, ता. ५ : राधानगरी-गैबी तिट्टा दरम्यान बाळूमामाच्या देवदर्शनासाठी निघालेल्या मालवण येथील कुटुंबीयांच्या मोटारीला आज दुपारी अपघात झाला. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. दुचाकीस्वाराला चुकवताना मोटार रस्त्याच्या कडेला उलटली.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार मालवणहून आदमापूर येथील बाळूमामाच्या देवदर्शनासाठी निघाले होते. राधानगरी येथील गैबी येथे आले असता अचानक आडवी आलेल्या दुचाकीला चुकवताना चालक सुमित ठोंबरे यांची मोटार (एमएच ०७ एजी ७८५०) रस्त्याच्या कडेला असणाऱ्या झाडाच्या बुंध्याला धडकून उलटली. यामध्ये श्रेया साळगावकर (वय ३०) यांच्या डोक्याला मार लागला. जयवंत मयेकर यांच्या उजव्या हाताला, तर मानस पाटकर (वय १०) याच्या हाताला दुखापत झाली आहे. घटनेची माहिती राधानगरी पोलिसांना समजताच घटनास्थळी पोलिस दाखल झाले व अपघातातील व्यक्तींना राधानगरी येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी पाठवले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: NSE IPO लिस्टिंगआधीच शेअर बाजार कोसळला! Sensex 634 अंकानी घसरला; कोणते शेअर्स तोट्यात? NSE IPOचं काय झालं?

‘फक्त टी-शर्ट घालून…’ तुकाराम मुंढेंचा सेलिब्रिटींच्या समर्थनावर सवाल, प्रीती झिंटा-मल्लिकाचा उल्लेख करत म्हणाले

Asian Games 2026: "गोल्ड मिस हो गया"; ३.८८ सेकंदाने सुवर्ण हुकले, ढसाढसा रडला सतनाम; रोशिबिना देवीचे सलग तिसरे पदक

Latest Marathi News Live Update : चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमिती गठीत

India New Zealand Tour : कसोटीच्या तयारीसाठी वनडेतून विश्रांती? ; न्यूझीलंड दौऱ्यासाठी मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांचे संकेत

SCROLL FOR NEXT