कोल्हापूर

राशिवडे-हसूर दुमाला रस्त्यावर खड्डा

CD

03567
राशिवडे ः राशिवडे ते हसूर दरम्यान रस्ता खचल्याने उंच-सखल अशी परिस्थिती निर्माण होऊन धोकादायक खड्डा आहे. या खड्ड्यामुळे अपघात घडण्याची शक्यता आहे. (राजू कुलकर्णी ः सकाळ छायाचित्रसेवा)
........
राशिवडे-हसूर दुमाला रस्त्यावर खड्डा

अपघाताची शक्यता ः तातडीने बुजवण्याची मागणी

सकाळ वृत्तसेवा
राशिवडे बुद्रुक, ता. ७ : राशिवडे ते हसूर दुमाला (ता. करवीर) दरम्यान रस्त्यावर मधोमध पडलेला खड्डा आणि एकेरी झालेला रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. दूरवर चांगला असणारा रस्ता अचानक एकेरी आणि खड्ड्यामुळे प्रवाशांना अंदाज येत नाही. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. हा परिसर सार्वजनिक बांधकाम विभागाची हद्द दर्शविणारा असल्याने हद्दीच्या वादात याकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता आहे.
याच मार्गावरील राशिवडे-हसूर दरम्यान करवीर सार्वजनिक बांधकाम विभाग आणि राधानगरी विभागाची हद्द संपते. मध्यंतरी कित्येक वर्षांपासून हा एक किलोमीटरचा मार्ग हद्दीच्या वादात रेंगाळला होता. अलीकडेच याचे रुंदीकरण आणि मजबुतीकरण झाले. परंतु बरोबर या हद्दीच्या कक्षेतच वारंवार रस्ता खचण्याचे प्रकार घडतात.
हा काळवाट आणि पूर्वीचा ओढ्याचा, दलदलीचा परिसर असल्याने रस्ता खचतो आणि धोकादायक बनतो. सध्याही या दोन्ही गावांच्या हद्दीवरच हा रस्ता मोठ्या प्रमाणात खचला आहे. साधारणतः ५० फुटांपर्यंत रस्ता किमान नऊ ते दहा इंचापर्यंत एकेरी आणि सखल झाल्याने वेगाने आलेले वाहन अशा परिस्थितीत उलटण्याचाही धोका आहे. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये तातडीने लक्ष देऊन दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.
....

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT