4908
राधानगरी : कोनोली तर्फ असंडोली येथील शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शेतकरी संघटनेच्या वतीने राधानगरी तहसील कार्यालयावर मोर्चा काढून निदर्शने केली.
.......
वारसा, सोडहक्क नोंदी पूर्ववत करा
असंडोलीतील जमीनप्रश्नी शेतकरी संघटनेचा राधानगरी तहसीलवर मोर्चा
सकाळ वृत्तसेवा
राधानगरी, ता. ३० ः तालुक्यातील कोनोली तर्फ असंडोली गावामध्ये वारसा, सोड हक्क, बोजा व इतर नोंदी प्रतिबंध केल्या असून, त्या सुरू व्हाव्यात, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी शेतकरी संघटनेच्या वतीने तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. प्रदेशाध्यक्ष प्रा. जालंदर पाटील व जिल्हाध्यक्ष अजित पोवार यांनी याचे मोर्चाचे नेतृत्व केले.
असंडोली गावातील शेतजमीन शेतकरी व वहिवाटदार यांच्या मालकीची असून सात बारा पत्रकी मूळ कब्जेदार शेतकरी मालक आहे. सातबारा पत्रकी रेषेच्या वरती स्वामी विद्याशंकर सरस्वती शंकराचार्य करवीर पीठ असे नाव दिसून येत होते. ही बाब जमीन शेतकरी व वहिवाटदार मालकांच्या लक्षात येताच सर्व खातेदारांनी तक्रार केली असता जिल्हाधिकारी, आयुक्त व राज्य महसूल मंत्री यांच्याकडून २०१४ मध्ये श्री शंकराचार्य यांचे नाव कमी करून घ्यावे, असा आदेश दिला. या अदेशामध्ये जिल्हाधिकारी व महसूल मंत्र्यांनी जमीन ही रयतावा संवर्गातील असून, ही रयतेच्या मालकीची आहे, असा आदेश दिला आहे. आदेशानुसार सातबारा पत्रकी शंकराचार्य यांचे नाव कमी केले आहे आणि ते इतर हक्कात फेरफार क्र. ५७२ ने ठेवले आहे.
शेतकऱ्यांच्या बाजूने निकाल असूनही शंकराचार्य यांनी अपील करून स्थगिती ठेवली आहे. तसेच या प्रकरणामध्ये न्यायालयाने खरेदी-विक्री स्थगिती ठेवली आहे. त्यामुळे गावात वारसा, सोडहक्क, बोजा व इतर नोंदी प्रतिबंध केल्या असून, त्या चालू व्हाव्यात, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. तसेच जमिनीचा कर शेतकरी नियमितप्रमाणे महसूल विभागाकडे जमा करत आहेत. ही जमीन महसूल कायदा १९६६ नुसार जमीन शेतकऱ्यांची मिळावी. गावामध्ये वारसा सोडहक्क बोजा व इतर नोंदी प्रतिबंध केल्या असून त्या सुरू कराव्यात, आदी मागण्या निवेदनाद्वारे केल्या आहेत.
यावेळी गजानन सोनार, मारुती पाटील, दिनकर कदम, सुनील शेळके, युवराज कुपले, शिवाजी कुपले यांच्यासह ग्रामस्थ शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
.......
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.