नरतवडेत ग्राम
सुरक्षा यंत्रणा
सोळांकूर, ता. २ ः ‘‘ग्रामसुरक्षा यंत्रणेमुळे चोरी, दरोड्याच्या घटनेत चोर होणार जेरबंद, ग्रामसभा, सरकारी योजनांची ग्रामस्थांना माहिती मिळणार आहे,’’ असे मत ग्राम सुरक्षा यंत्रणेचे संचालक डी. के. गोर्डे-पाटील यांनी केले. ते नरतवडे (ता. राधानगरी) येथे ग्राम सुरक्षा यंत्रणा कार्यक्रमात बोलत होते. अध्यक्षस्थानी तहसीलदार अनिता देशमुख होत्या.
सर्व ग्रामपंचायतीनी ग्रामसुरक्षा यंत्रणेचा प्रभावीपणे वापर करावा. आपत्कालीन व्यवस्थेसह महत्त्वाच्या योजनांची माहिती नागरिकांपर्यंत एकाच वेळी पोहोचवण्यासाठी ग्रामसुरक्षा यंत्रणा महत्वाची आहे, असे मत अनिता देशमुख यांनी व्यक्त केले. यावेळी पोलिस निरीक्षक संतोष गोरे, तालुका आरोग्याधिकारी राजकुमार शेटे, गणेश लोकरे, विक्रमसिंह घाटगे, सरपंच, उपसरपंच, मंडलाधिकारी, पोलिस पाटील, आशासेविका,अंगणवाडी सेविका, तलाठी उपस्थित होते. पोलिस स्टेशन हद्दीत संकट काळात आपत्तीग्रस्त नागरिकाने टोल फ्री नंबर १८००२७०३६००/ ९८२२११२२८१ वर कॉल केल्यास संबंधित व्यक्तीचा आवाज गावातील नागरिकांना कॉल स्वरूपात तत्काळ ऐकवला जाणार असल्याने गुन्ह्यांना आळा घालणे शक्य होईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.