कोल्हापूर

‘भोगावती शिक्षण’बाबतचा कैफियत मोर्चा रद्द : पाटील

CD

‘भोगावती शिक्षण’बाबतचा
कैफियत मोर्चा रद्द : पाटील
राशिवडे बुद्रुक, ता. ५ : भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाबाबत धर्मादाय उपायुक्त यांना दिलेला बदल अर्ज मागे घेऊन निवडणूक प्रक्रिया घेण्याच्या निर्णयामुळे उद्या (ता. ६) होणारा कैफियत आंदोलन मोर्चा रद्द करण्यात आला आहे, अशी माहिती मोर्चाचे नेते डॉ. जालंदर पाटील यांनी दिली आहे.
डॉ. पाटील म्हणाले, ‘‘भोगावती शिक्षण प्रसारक मंडळ हे ३२ हजार सभासदांचे राहावे यासाठी भोगावती कारखान्याच्या सर्वसाधारण सभेमध्ये सहा तारखेला शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष जयसिंगराव हुजरे व ए. वाय. पाटील यांच्या दारासमोर कैफीयत आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. मात्र याच दरम्यान या संदर्भात बैठक झाली. या बैठकीला ए. वाय. पाटील, पी. डी. धुंदरे, शिवाजीराव पाटील, राजाराम कवडे, के. बी. पाटील, ए. डी. चौगले, जयसिंगराव हुजरे, सर्जेराव पाटील ,पांडुरंग पाटील, बंडोपंत वाडकर, सरदार पाटील उपस्थित होते. या बैठकीत सर्वानुमते शिक्षण प्रसारक मंडळाचे बदल अर्ज मागे घेऊन निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी धर्मादाय उपायुक्त यांच्याकडे लेखी मागणी करण्याचे ठरले. त्या अनुषंगाने अध्यक्ष हुजरे व उपाध्यक्ष सर्जेराव पाटील यांच्यासह आणखी तीन संचालकांनी लेखी संमती पत्र लिहून दिलेले आहे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा मोठी 'खेळी'! ठाकरे गटातील खासदार शिंदेसेनेत येणार? एकनाथ शिंदेंची दिल्लीत गुप्त रणनीती

सुरज चव्हाण होणार बाबा? बायकोच्या 'त्या' पोस्टने वेधलं सगळ्यांचं लक्ष, Viral Video

120000000000! राजस्थान रॉयल्स फ्रँचायझी विकणे आहे; भारताची मोठी कंपनी तगडी रक्कम मोजून बनणार मालक, ४ स्पर्धक शर्यतीत

Latest Marathi News Live Update : पंढरपूर येथील सांगोला पेपर चोरी प्रकरण; दोन विद्यार्थी पोलिसांच्या ताब्यात

Pune Rain: पुण्यात पावसाला सुरुवात! कोथरुड, बाणेर भागात ढगांचा गडगडाट; हवामान विभागाचा अलर्ट

SCROLL FOR NEXT