वाकीघोलातील खेडी येणार रेंजमध्ये
दाजीपूरसह सात गावांत मोबाईल टॉवर उभारणी सुरू
सकाळ वृत्तसेवा
राधानगरी, ता. १७ ः तालुक्यात दाजीपूरसह सात गावांत नवीन मोबाईल टॉवर उभारणी सुरू झाली आहे. त्यामुळे आता लवकरच अभयारण्य क्षेत्राबरोबरच वाकीघोलातील खेडी मोबाईल रेंजमध्ये येणार आहेत. मोबाईल सेवा सुरू होऊन पंचवीस वर्षांचा कालावधी लोटला तरी केवळ टॉवर नसल्याने अभयारण्य आणि वाकीघोल क्षेत्रातील बहुतांशी खेड्यांत मोबाईल सेवा पोहोचलेली नाही.
दाजीपूर, आडोली, चाफोडीतर्फे ऐनघोल, गावठाणवाडी, सावर्दे, दुबळेवाडी आणि कंदलगाव येथे नवीन मोबाईल टॉवर उभारणीस वर्षभरापूर्वीच मंजुरी मिळाली. मात्र, टॉवर उभारणीसाठीच्या साहित्याचा संबंधित कंपनीकडून वेळीच पुरवठा झाला नसल्याने काम लांबणीवर पडले होते. ‘सकाळ’ने याप्रश्नी लक्ष वेधल्यानंतर साहित्य पुरवठा होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे. खेड्यापाड्यांत मोबाईल व इंटरनेट सुविधा पोहोचविण्यासाठी डिजिटल इंडिया योजनेंतर्गत ग्राउंड बेस होस्टिंग आणि इक्विपमेंट या प्रयोजनासाठी बीएसएनएलने सात ठिकाणी नवीन टॉवर उभारणी प्रस्तावित केली आहे.
नवीन टॉवर उभारणीमुळे गेली अनेक वर्षे मोबाईल व इंटरनेट सुविधापासून दूर राहिलेल्या खेड्यांत आता फोर-जी सेवा उपलब्ध होणार आहे. प्रस्तावित टॉवर उभारणीचे काम गतीने पूर्ण झाल्यास नवीन वर्षात अभयारण्य आणि वाकीघोलातील सर्व खेड्यांमध्ये मोबाईल व इंटरनेट सुविधा सुरू होईल.
.....
चौकट...
कोरोना काळात गैरसोय
वाकीघोल परिसरातील आडोली आणि त्या परिसरातील विद्यार्थ्यांनी कोरोना काळात उंच डोंगरावर झोपडी बांधून तळकोकणातून येणाऱ्या मोबाईल रेंजचा फायदा घेऊन अभ्यास केला होता. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनीही दुर्गम डोंगरात जाऊन अभ्यास केला होता. याबाबतचे वृत्तही ‘सकाळ’मध्ये दोन वर्षांपूर्वी प्रसिद्ध झाले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.