सकाळी अकरा ते दुपारी तीनपर्यंत
इतर कामकाजासाठी फिरकू नये
राधानगरीत महसूल विभागाचा अजब आदेश
राशिवडे बुद्रुक, ता. २२ : आजपासून राधानगरी विधानसभा मतदारसंघासाठी राधानगरी तहसील कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असतानाच सकाळी अकरा ते दुपारी तीन वाजेपर्यंत इतर कामकाजसाठी कुणीही फिरकू नये, असा आदेशच महसूल विभागाने काढला आहे. यामुळे चार उमेदवारांसाठी तालुक्यातील चार लाख जनता वेठीस धरण्याचे प्रकार असल्याची प्रतिक्रिया जनतेतून उमठू लागली आहे.
आजपासून चार नोव्हेंबरपर्यंत चालणाऱ्या कामकाजाच्या वेळेत अकरा ते तीन या दरम्यान कोणत्याही कामासाठी येणाऱ्या व्यक्तीला मज्जाव केला आहे. कार्यालयाच्या परिघात १०० मीटरपर्यंत कोणीही फिरू नये, कामकाज बंद राहील, असा आदेशच येथील तहसीलदार अनिता देशमुख यांनी काढला आहे. याबाबत तहसीलदार देशमुख यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. मात्र, नायब तहसीलदार लोकरे यांनी याला दुजोरा दिला आहे.
चौकट
कामासाठी आलेल्यांची अडवणूक
नवडणुकीत मतदान आणि मतमोजणी यासाठी १०० मीटरचे नियम आहेत. आजवर येथे असे कधी घडले नव्हते. आज दिवसभरात येथे कामासाठी आलेल्यांची अडवणूक झाली. आर्थिक भुर्दंड आणि वेळेचा अपव्यय झाला. या १०० मीटरमध्ये पोलिस ठाणे व न्यायालयही येते. मग, तेथील कामकाज बंद ठेवणार काय, हाही मुद्दा पुढे आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.