‘भोगावती’ची ३२००
प्रमाणे ऊस बिले जमा
राशिवडे बुद्रुक, ता. ७ : भोगावती सहकारी साखर कारखान्याने चालू गळीत हंगामातील पहिल्या पंधरवड्यातील ऊस बिले प्रतिटन ३२०० प्रमाणे उत्पादकांच्या खात्यावर वर्ग केल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष प्रा. शिवाजीराव पाटील व उपाध्यक्ष राजाराम कवडे यांनी दिली.
डिसेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात गाळप झालेल्या ६५ हजार ४५९ मेट्रिक टन उसाच्या बिलापोटी २० कोटी ९४ लाख ७१ हजार रुपये ऊस उत्पादकांच्या बँक खात्यावर वर्ग केलेले आहेत. कारखान्याने ३६ दिवसांत एक लाख ६० हजार ९८० टन उसाचे गाळप करून ए लाख ७९ हजार ६५० क्विंटल साखर उत्पादित केली असून, सरासरी साखर उतारा ११.३५ एवढा आहे. कारखान्याने यंदा सहा लाख मेट्रिक टन ऊस गळपाचे उद्दिष्ट ठेवले असून, ते पूर्ण करण्यासाठी सभासदांनी आपला सर्व ऊस कारखान्याला पाठवून सहकार्य करावे, असे आवाहन प्रा. पाटील व कवडे यांनी केले. यावेळी कारखान्याचे सर्व संचालक व प्रभारी कार्यकारी संचालक संजय पाटील उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.