कोदवडे, वाघवडेत
गव्यांचे दर्शन
राशिवडे बुद्रुक, ता. ७ : कोदवडे व वाघवडे (ता. राधानगरी) या गावांच्या शिवारात चार दिवसांपासून गव्यांचा वावर आहे. या परिसरात कामासाठी गेलेल्या अनेक शेतकऱ्यांना त्यांनी दर्शन दिले, तर नुकतीच उगवून आलेली उसाची लावण त्यांच्याकडून फस्त केली जात आहे. कोदवडे आणि वाघवडे या गावांच्या डोंगर परिसरामध्ये प्रादेशिक वनक्षेत्र आहे. शिवाय डोंगररांग मोठी असल्याने चार दिवसांपासून येथे एक गव्याची जोडी वस्तीला आहे. अभयारण्यापासून सुमारे ३० किलोमीटरवर असलेल्या परिसरात गवे आल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वन विभागाकडून त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.