कोल्हापूर

भाजपा मेळावा

CD

कसबा वाळवे मतदारसंघातील
भाजप कार्यकर्त्यांची चंद्रेत बैठक

कसबा वाळवे, ता. १८ : राधानगरी भाजपच्यावतीने कसबा वाळवे जिल्हा परिषद मतदारसंघातील कार्यकर्त्यांची चंद्रे येथे संघटनात्मक बैठक झाली. आगामी निवडणुका कार्यकर्त्यांना संधी देणाऱ्या आहेत. कसबा वाळवे मतदारसंघातील निष्ठावंत कार्यकर्त्यांना पक्ष संघटनेतील महत्त्वाच्या पदावर आणि अशासकीय समित्यांमध्ये संधी मिळावी, विकास निधीत वैयक्तिक लाभार्थ्यांच्या कामांना प्राधान्य मिळावे, अशा मागणीचा कार्यकर्त्यांच्या एकमुखी सूर निघाला.
बैठकीमध्ये पक्ष निरीक्षक भाजप कोल्हापूर ग्रामीणचे जिल्हा उपाध्यक्ष वसंतराव प्रभावळे यांनी सक्रिय सभासद, बूथ समिती रचनेचा आढावा घेऊन नवीन मंडल अध्यक्ष निवडीसंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले..
तालुकाध्यक्ष विलास रणदिवे म्हणाले, ‘पक्ष सभासद नोंदणी आणि पक्षाने राबविलेल्या कार्यक्रमांमध्ये कसबा वाळवे मतदारसंघातून चांगली कामगिरी झाली आहे. पुढील काळात येथील नेत्यांना योग्य पदांची संधी मिळेल.’ जिल्हा प्रसिद्धीप्रमुख महेश पाटील, साताप्पा धनवडे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी ज्येष्ठ नेते सुधाकर गुरव, आर. डी. पाटील, के. टी. कासोटे, अशोक खोत, मधुकर निकम, चंद्रकांत भिऊंगडे, विनोद कुलकर्णी, बाळकृष्ण सुतार, शरद पाटील, आदी उपस्थित होते. स्वप्नील जरग यांनी स्वागत केले. शरद पाटील यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold News: सोनं महागलं, आता ड्युटीचाही भार! सरकारच्या 'या' एका निर्णयाने सोन्याची चमक फिकी; खरेदीत तब्बल ७०% घट

IPL 2026 फायनलच्या २४ तासांपूर्वीच गुजरात टायटन्स संघ अडचणीत सापडला! अहमदाबादला पोहोचण्यास उशीर होणार; चिंता वाढली

Cotton Import Duty Waiver : कापूस आयातीवरील 11 टक्के सीमा शुल्क पूर्णपणे माफ; केंद्र शासनाकडून अधिसूचना जारी, वस्त्रोद्योगाला मोठा दिलासा

Raigad Infrastructure Upgrade: पालीकरांचे स्वप्न साकार; पाली-सुधागड एसटी बसस्थानक पुनर्विकासासाठी १४ कोटींची मंजुरी, तीन महिन्यांत भूमिपूजन

Nasrapur Crime : नसरापूर अत्याचार-खून प्रकरणात सुनावणीला वेग; आरोपीचा शोध घेणाऱ्या दोन महत्त्वाच्या साक्षीदारांची साक्ष नोंद

SCROLL FOR NEXT