कोल्हापूर

भोगावती शिक्षण मंडळ

CD

07686

भोगावती शिक्षण मंडळाचा
कारभार टांगला ‘वेशीवर’

मुख्य गेटवर निषेध फलक; स्वीकृत संचालकांवरून राजकारण

राशिवडे बुद्रुक, ता. २३ : भोगावती शिक्षण प्रसारक मंडळासाठी तीन स्वीकृत संचालक घेण्यासाठी हालचाली सुरू आहेत. याविरोधात आज अनोळखींनी भोगावती कॉलेजच्या मुख्य गेटवरच निषेध फलक लावला. यामुळे शिक्षण प्रसारक मंडळाचा कारभार वेशीवर टांगला असल्याची चर्चा रंगली आहे.
कारखान्याच्याच तीस हजार सभासदांच्या मालकीचे असलेल्या शिक्षण प्रसारक मंडळावर राजकारण सुरू आहे. गतवेळी सर्व पक्षांनी समावेशक पॅनल करून सत्ता दिली आहे. याच संचालक मंडळाचा इथे कारभार आहे. आता स्वीकृत संचालकाबाबत राजकारण सुरू झाले आहे. राधानगरी तालुक्यात दोन व करवीरला एक असे वाटप झाले असल्याचे समजते. पण राहुल पाटील यांच्या एका गटाचा या स्वीकृत जागा भरण्यास विरोध सुरू आहे. राहुल पाटील यांचाही जागा भरण्यास विरोध असल्याचे समजते.
ए. वाय. पाटील यांचा भोगावती कारखाना व शिक्षण प्रसारक मंडळात वाढलेला हस्तक्षेप राहुल पाटील गटाला व शेकापला आवडलेला नाही. यातूनच या जागा भरण्यास विरोध होत आहे. भोगावती कारखान्यातही स्वीकृत संचालक घेण्याच्या हालचाली सुरू आहेत. ए. वाय. यांना कारखाना व शिक्षण मंडळात दोन्ही ठिकाणी का जागा द्यायच्या; असा सूर येऊ लागला. त्यातूनच गुरुवारी रात्री शिक्षण प्रसारक मंडळाच्या मुख्य इमारतीवर निषेधाचे पोस्टर लावल्याने खळबळ उडाली आहे. मुळातच धर्मादाय संस्थेला स्वीकृत संचालक भरता येत नाहीत. आजचे निषेधाचे बँनर दोन्ही तालुक्यांत मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
. . . . . . .
चौकट
शिक्षण प्रसारक मंडळात राजकारण नको म्हणून पोटनिवड नियम बदलून विश्वस्त देण्याबाबत चर्चा होती. मात्र अद्यापही पोटनियम बदलाच्या हालचाली नाहीत. स्वीकृत भरतीबाबत ज्या राजकीय नेत्यांनी शब्द दिले आहेत त्यांचे धाबे दणाणले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MLC Election 2026: विधान परिषद निवडणुकीत मोठा धक्का! पराभूत दिग्गजांना 'नो एंट्री'; भाजपची ‘नो रिपीट’ पॉलिसी लागू

काजोलने का तोडला स्वतःच बनवलेला नियम? 'या' सीरिजमध्ये दिला किसिंग सीन, अखेर अभिनेत्रीने सांगितलं कारण

Latest Marathi News Live : आळंदी येथे आढळला पहिल्यांदा 9 फुटी अजगर

Western Ghats Biodiversity: पश्चिम घाटात ओडोनाटाच्या १४३ प्रजातींची नोंद; जैवविविधतेत ३५% घट चिंताजनक, दोन वर्षांच्या सर्वेक्षणाचा धक्कादायक निष्कर्ष!

Kolhapur Circuit Bench : 23 एकर जागा मिळाली, आता 50 एकरची गरज! खंडपीठासाठी शेंडा पार्कात आणखी जागा आवश्‍यक, मुख्य न्यायमूर्तींकडून पाहणी

SCROLL FOR NEXT