07897,07896
राधानगरी : राधानगरी धरणातील पाणी पूजन करून शाहू महाराजांच्या पुतळ्यास अभिषेक करून वंदन करताना समरजितसिंह घाटगे व नवोदितादेवी घाटगे.
राज्याला दिशा देणारे कार्य उभे करूया
समरजितसिंह घाटगे : राधानगरी धरणस्थळी जयंती सोहळा
राधानगरी, ता. २६ : ‘‘लोकराजे राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि कृषीविषयक विचारांपासून प्रेरणा घेऊन राज्याला दिशा देणारे आदर्श कार्य कोल्हापूरच्या भूमीत उभे करूया’’, असे प्रतिपादन शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी केले.
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या १५२ व्या जयंतीनिमित्त त्यांनी उभारलेल्या ऐतिहासिक राधानगरी धरणस्थळी आयोजित सोहळ्यात घाटगे बोलत होते. समता रॅलीने आलेल्या हजारो शाहूप्रेमींच्या उपस्थितीत जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. प्रारंभी समरजितसिंह घाटगे, नवोदितादेवी घाटगे, तसेच राधानगरी परिसरातील बारा बलुतेदार जोडप्यांच्या हस्ते धरणातील जलपूजन झाले. वाद्यांच्या गजरात जलकलश मिरवणुकीद्वारे जयंतीस्थळी आणण्यात आले व महाराजांच्या पुतळ्यास जलाभिषेक केला. यावेळी गुणवंतांचाही सन्मान झाला.
घाटगे म्हणाले, ‘‘राधानगरीतील हा जयंती सोहळा आता लोकोत्सव बनला आहे. शाहू महाराजांच्या जल व कृषीनितीचा वारसा पुढे नेत शेतीमध्ये ठिबक सिंचन, कृत्रिम बुद्धिमत्ता, सौरऊर्जा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर उत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्न केले जातील.’’
यावेळी निगवे येथील शिवछत्रपती मर्दानी आखाडा पथकाने मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके सादर केली. संभाजी आरडे यांनी स्वागत केले. स्वप्नील जरग यांनी आभार मानले.
---------------------
चौकट :
समता रॅली
शाहू महाराजांचे जन्मस्थळ कसबा बावडा येथून सकाळी हजारो मोटरसायकलस्वारांची भव्य समता रॅली राधानगरी धरणाकडे रवाना झाली. यशराजे घाटगे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. मार्गावरील गावागावांत रॅलीचे स्वागत झाले. घाटगे यांच्या संकल्पनेतील हा उपक्रम कौतुकाचा विषय ठरला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.