कोल्हापूर

बिद्री-बाचणी मार्गावर खड्डे

CD

08055
कसबा वाळवे : बिद्री ते बाचणी मार्गाची झालेली दुरवस्था.

बिद्री-बाचणी मार्गावर खड्डे
कसबा वाळवे, ता. ८ : येथून बिद्री व बाचणी मार्गावर प्रवास करणे सध्या जिकरीचे बनले आहे. काही दिवसांपूर्वी तात्पुरत्या स्वरूपात मुरूम टाकून खड्डे बुजवुले होते; पण सतत पडणाऱ्या पावसामुळे मुरूम वाहून गेल्याने खड्डे पुन्हा उघडे झाले आहेत. त्यामळे बिद्री- कसबा वाळवा ते बाचणी या जवळपास दहा ते बारा किलोमीटर लांबीच्या रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे.
पाणी निचऱ्याचे योग्य नियोजन नसल्याने ठिकठिकाणी पाणी साठवून खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. पाऊस लागल्यानंतर खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने काही खड्ड्यांचा अंदाज न आल्यामुळे किरकोळ अपघातही घडत आहेत. रस्त्याच्या या झालेल्या दुर्देशेबद्दल वाहनधारकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. या मुख्य मार्गावरून बिद्री, वाळवे खुर्द, चंद्रे, शेळेवाडी, बारडवाडी, जोगेवाडी, तळाशी, कसबा वाळवे, चांदेकरवाडी, बेलवळे, केबळी, बाचणी आणि परिसरातील वाड्या-वस्तींवरील नागरिकांची या रस्त्यावरून कायमच वर्दळ असते.
YEL26B08055

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Milk Adulteration : दुध भेसळीचे धागेदोरे मंचरपासून सोलापूर, इंदापूरपर्यंत; ‘एफडीए’ ने काढली भेसळखोरांची कुंडली, 'सोनाई डेअरी'ला भेसळयुक्त दूधाचा पुरवठा

Pune News : आम्ही अधिकारी होण्याचे स्वप्न बघायचे नाही का?; महाज्योतीच्या विद्यार्थ्यांचा सवाल, दोन केंद्रावरील परीक्षा रद्द

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

Shendurwada News : रक्तरंजित वाळू, जमिनीच्या व्यवहाराची नशा, अन् विकासकामांतील भ्रष्टाचार मार्गाने पैसा कमावण्याचा नाद सुटेना

MPSC Agitation Suspended : एमपीएससी विद्यार्थ्यांचे टिळक चौकातील आंदोलन स्थगित; उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर निर्णय

SCROLL FOR NEXT