कोल्हापूर

अर्धवट वाळवे पूल

CD

फोटो
कसबा वाळवे : येथील दूधगंगा नदीवरील अर्धवट पूल.
--
कसबा वाळवे-चंद्रे पूल १३ वर्षे रखडलेलाच
लालफितीचा फटका; भूसंपादन मोबदल्याचा प्रश्न
सकाळ वृत्तसेवा
कसबा वाळवे, ता. २५ : येथील दूधगंगा नदीवरील जुन्या बंधाऱ्याला पर्याय म्हणून बारमाही वाहतुकीसाठी कसबा वाळवे-चंद्रे पुलाचे काम सुरू झाले. मात्र, शासकीय अनास्था, भूसंपादन आणि बांधकाम विभागांमधील समन्वयाच्या अभावामुळे तब्बल १३ वर्षांनंतरही पूल लालफितीत अडकला आहे. महापुरात १५ ते २० गावांचा संपर्क तुटून नागरिक आणि विद्यार्थ्यांचे हाल कायम आहेत. शासनाच्या अर्धवट कामकाजाचा उत्तम नमुना म्हणजे हा अर्धवट पूल ठरलेला आहे.
येथील जीर्ण बंधाऱ्याचे पिलर कोसळत असल्याने तत्कालीन खासदार कै. सदाशिवराव मंडलिक यांचे प्रयत्न व त्यासाठी माजी आमदार कै. नामदेवराव भोईटे आणि कै. मारुतीआण्णा फराक्टे यांच्या विशेष पाठपुराव्यातून या पुलाला मंजुरी मिळाली. पुलाच्या अपेक्षित उंचीसाठी निधी कमी पडू लागल्यानंतर तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कसबा वाळवे गाव दत्तक घेऊन पुलाला वाढीव निधी मंजूर करून कामाला गती दिली.
४ कोटी १३ लाख खर्चाच्या या प्रकल्पाचे काम ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. १०५ मीटर लांबीच्या व १५ मीटरचे सात गाळे असलेल्या या पुलाचे नदीपात्रातील काम आणि वाळवे बाजूकडील ‘अबटमेंट’ पूर्ण झाले आहे. मात्र, चंद्रे बाजूकडील तीन-चार शेतकऱ्यांना विश्वासात न घेता व नुकसानभरपाई न देता काम सुरू केल्याने त्यांनी ‘पंतप्रधान ग्रामसडक योजने’कडे तक्रार नोंदवून काम रोखले. यामुळे वाळवेकडील बाजूचा १९० मीटर आणि चंद्रे बाजूचा २२० मीटरचा जोडणारा रस्ता पूर्ण होऊ शकलेला नाही.
--
कोट
कसबा वाळवे-चंद्रे येथील दूधगंगा नदीवरील पुलाचे काम हे प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून सुरू असून, त्याची कोणतीही माहिती उपलब्ध नाही. या बांधकामाबाबत गेल्या वर्षी भूसंपादन करण्याची जबाबदारी आमच्याकडे दिली आहे. त्याबाबतचा प्रस्ताव हा मंत्रालयात पाठविला आहे.
- प्रवीण कदम, उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, राधानगरी.
--
पॉईंटर :
- दरवर्षी महापुरात जुना बंधारा पाण्याखाली जातो.
- १५ ते २० गावांचा थेट संपर्क तुटतो.
- विद्यार्थी, शेतकरी व कामगारांचा नाहक खोळंबा होतो.
- बाधित शेतकऱ्यांना योग्य नुकसानभरपाई देऊन सामोपचाराने प्रश्न सोडवावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal : 'आमची सत्ता आली तर, ई-२० पेट्रोलवर ५ दिवसांत बंदी घालणार'... केजरीवाल यांची गोव्यात मोठी घोषणा

CJP Expansion: कॉकरोच जनता पार्टीची नवी टीम जाहीर! रांका-दास यांच्यानंतर २ नवे राष्ट्रीय प्रवक्ते कोण? कोणाला कोणती जबाबदारी?

Pune News : राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना आवरा; भाजप शहराध्यक्षांची सुनेत्रा पवारांकडे मागणी

Marathi News Live Updates : जळगाव पोलिसांनी मोठ्या आवाजाची निर्मिती करणाऱ्या 'मॉडिफाईड' सायलेन्सर्सविरुद्ध कठोर कारवाई सुरू केली

Talegaon Dhamdhere News : हिंद केसरीचा मानकरी विज्या बैलाचा मृत्यू; मालकाने केला धार्मिक विधी

SCROLL FOR NEXT