tomorrow last papers of 10th class for karnataka 
कोल्हापूर

हुश्श! संपली बाबा एकदाची परीक्षा! आता फक्त निकालाची प्रतीक्षा! 

सकाळ वृत्तसेवा

बेळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा होणार की नाही याची मोठी चिंता लागून राहिलेल्या दहावी परीक्षेची शुक्रवारी (ता. 3) सांगता होणार आहे. त्यामुळे शिक्षण खात्याला मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच विद्यार्थीही चिंतामुक्त होणार आहेत.


गुरुवारी दहावीचा मराठी (प्रथम भाषा) विषयाचा पेपर पार पडला. पेपरला सुरवात होण्यापूर्वी विद्यार्थ्यांची थर्मल स्क्रिनिंग करण्यात आली. प्रथम भाषा विषयाच्या पेपरला बेळगाव शैक्षणिक जिल्हात 774 विद्यार्थी गैरहजर राहिले तर 30877 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून आतापर्यंत झालेले 5 पेपर शांततेत पार पडल्याने शेवटचा पेपरही सुरळीतरित्या पार पडेल असा विश्वास शिक्षण खात्यातून व्यक्त केला जात असून शेवटच्या पेपर दिवशीही विद्यार्थ्यांनी सामाजिक अंतर राखावे असे आवाहन शिक्षण खात्याने केले आहे. 


मार्च महिन्यात होणारी दहावीची परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. त्यामुळे परीक्षा कधी होणार याची विद्यार्थ्यां वाट पाहत होते. मात्र कोरोनाचे संकट असतानाही शिक्षण खात्याने सामाजीक अंतर राखत आणि इतर गोष्टींकडे लक्ष देत परीक्षा काळात कोणत्याही प्रकारचा गोंधळ होणार नाही याकडे लक्ष दिले होते. त्यामुळे आतापर्यंत परिक्षा सुरळीत पार पडली आहे. शुक्रवारी कन्नड (तृतीय भाषा) विषयाचा पेपरने परीक्षेने सांगता होणार आहे. 

शिक्षण खात्याने अतिशय चांगल्या प्रकारे परीक्षेबाबत दक्षता घेतली. त्यामुळे परीक्षा शांततेत पार पडली असून शेवटच्या पेपरवेळीही विद्यार्थ्यांनी  सामाजिक अंतर राखावे. 
-ए. बी. पुंडलिक, जिल्हा शिक्षणाधिकारी


पहिल्या दिवसापासून परीक्षा अतिशय चांगल्या प्रकारे घेण्यात आली आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारचे दडपण आले नाही. शेवटचा पेपरही चांगल्या प्रकारे देणार आहे.
-मानशी पाटील, विध्यार्थीनी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CBSE Three Language Policy : सीबीएसईच्या सहावीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! त्रि-भाषा धोरणाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल; काय दिले निर्देश?

Alegaon Murum Mining: आळेगाव पागा मुरूम उत्खनन प्रकरण: पंचनाम्यातील आकडे संशयास्पद, पर्यावरणप्रेमींची सखोल चौकशीची मागणी

Pitru Paksha 2026 : पितृपक्षात श्राद्धाचं जेवण कसं असावं? शास्त्रानुसार काय वाढावं आणि काय टाळावं जाणून घ्या

Mumbai Indians ने कर्णधारासह ११ खेळाडूंना केलं रिटेन! फ्रँचायझीने संघाबाहेर केलेल्यांची यादीच जाहीर केली

DCM Sunetra Pawar : बारामती बँकेने कार्यक्षेत्र विस्तारुन आर्थिक सहाय्य करावे

SCROLL FOR NEXT