A tone of satisfaction came from the police station 
कोल्हापूर

पोलिस ठाण्यातून निघाले समाधानाचे सूर

राजेश मोरे

कोल्हापूर ः बदली कोठे अपेक्षित आहे त्याचा अग्रक्रम विचारून अपेक्षित ठिकाणी पोलिस कर्मचाऱ्यांचा बदल्या झाल्याने जिल्ह्यातील पोलिस दलात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. पोलिस कर्मचाऱ्यांची प्रशासकीय व विनंती बदली प्रक्रिया पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अपर पोलिस अधीक्षक तिरुपती काकडे यांच्या उपस्थितीत सायंकाळपर्यंत सुरू होती. यात सुमारे साडेतीनशेहून अधिक पोलिसांच्या बदल्या झाल्या.

एकाच ठाण्यात पाच वर्षे व त्यापेक्षा अधिक सेवा बजावलेल्या कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया आज राबविली. पोलिस अधीक्षक कार्यालयातून पोलिस अधीक्षक डॉ. देशमुख यांनी व्हीसीद्वारे प्रत्येक ठाण्यातील पोलिस कर्मचाऱ्यांशी संपर्क साधला. सहायक फौजदार ते कॉन्स्टेबल अशा 350 कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय तर 87 विनंत्या बदल्याची प्रक्रियेस सकाळी सुरवात झाली. त्या त्या ठाण्यात बदलीस पात्र कर्मचारी व्हीसीसमोर होते. पोलिस अधीक्षकांनी त्यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी बजावलेली सेवा, बदलीचे अपेक्षित ठिकाण त्याची उपलब्धता याचा विचार करून प्रक्रिया राबविली. निवृत्तीच्या उंबरठ्यावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या पसंतीच्या ठिकाणी बदली दिली. अशा समाधान मिळवून देणाऱ्या बदलीप्रक्रियेमुळे सर्वच पोलिसांच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव दिसत होते. 

डॉ. देशमुख यांचे आभार
बदलीमुळे दुसऱ्या ठाण्यात जावे लागणार. पाच वर्षांत सहकाऱ्यांबरोबर जुळलेले ऋणानुबंध दुरावणार त्यामुळे भावनिक वातावरणही पाहावयास मिळाले. तत्कालिन पोलिस अधीक्षक मनोज कुमार शर्मा यांच्यानंतर पहिल्यांदाच कर्मचाऱ्यांच्या अपेक्षेला प्राधान्य देणाऱ्या बदली प्रक्रियेबद्दल पोलिस अधीक्षक डॉ. देशमुख यांचे कौतुकही केले जात होते. 

संपादन ः रंगराव हिर्डेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TV New Rules : सरकारची करडी नजर तुमच्या टीव्हीवर! मोफत टीव्ही पाहणे पडेल महागात? TRAIचे नवीन नियम जाणून घ्या

इराणमध्ये घुसून अमेरिकेच्या SEALने पायलटला सुखरुप परत आणलं; भारताकडेही आहे MARCOS, पाकिस्तानला कळणारही नाही की...

Pakistan Petrol Rate : पेट्रोल दरवाढीनंतर पाकिस्तानमध्ये जनतेचा संताप उसळला; एक लीटरची किंमत ऐकून धक्का बसेल

Sangli Crime : रक्ताळलेली सांगली! 4 दिवसांत 6 खून; कुपवाडमध्ये पत्नीनेच पतीला संपवलं, तर कवलापूरच्या यात्रेत अनैतिक संबंधातून दगडाने ठेचून हत्या

Chhatrapati Sambhajinagar: पीएनजी कामांमुळे रस्त्यांची दुरवस्था; बजाजनगरमध्ये उखडलेले रस्ते पूर्ववत न केल्याने नागरिक त्रस्त

SCROLL FOR NEXT