Tourists are canceling bookings abroad due to fear of Corona 
कोल्हापूर

कोरोनाचा धसका घेत बेळगावच्या पर्यटकांकडांनी घेतला 'हा' निर्णय...

सकाळ वृत्तसेवा

बेळगाव - चीननंतर जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोना व्हायरसचा फटका बेळगाव परिसरातील टूर्स ॲण्ड ट्रॅव्हल्स कंपन्यांना बसू लागला आहे. कोरोनाच्या भीतीमुळे अनेकांकडून विदेशातील बुकिंग रद्द करण्यात येत आहे. त्यामुळे दरवर्षी उन्हाळी सुटी कॅश करणाऱ्या टूर्स कंपन्यांना मोठे नुकसान सहन करावे लागणार आहे.

शहर आणि परिसरातील अनेक टूर्स ॲण्ड ट्रॅव्हल्स कंपन्यांकडून विविध ठिकाणच्या सहलींचे आयोजन केले जाते. दरवर्षी एप्रिल व मे महिन्यात नागरिक विदेश व इतर ठिकाणी जाण्यासाठी अधिक प्रमाणात बुकींग करतात, परंतु कोरोना व्हायरसमुळे अनेकांनी बुकिंग रद्द करण्यास सुरुवात केली आहे. त्याचा फटका टूर्स ॲण्ड ट्रॅव्हल्स कंपन्यांना बसण्याची चिन्हे दिसू लागली आहे. दुबई, सिंगापूर, मलेशिया, थायलंड, बॅंकॉक व युरोपला जाणाऱ्या पर्यटकांची संख्या रोडावली असून सध्या ४० टक्‍क्‍याहून अधिक जणांची तिकिटे रद्द झाली आहेत. कोरोनामुळे विदेशी पर्यटनावर मोठा परिणाम होत असून आणखीन काही दिवस अशीच परिस्थिती राहिल्यास उन्हाळ्यात ट्रॅव्हल्स कंपन्यांना पर्यटकांना शोधण्याची वेळ येणार आहे.

बेळगाव आणि आसपासच्या जिल्ह्यातून विदेशात पर्यटनाला जाणाऱ्यांची वार्षिक संख्या मोठी आहे. सर्वाधिक टूर एप्रिल ते जूनपर्यंत असतात. विदेशात सहलीचे आयोजन करणाऱ्या ट्रॅव्हल्स कंपनीकडून ग्राहकांना आकर्षिक करुन घेण्यासाठी विविध पॅकेज जाहीर केले जातात. यावेळीही दोन-तीन महिन्यापूर्वी आकर्षक पॅकेजची घोषणा करण्यात आली होती. पण, अनेकांनी थायलंड, बॅंकाक, सिंगापूर, श्रीलंका, नेपाळ, दुबई, शारजाह आदी ठिकाणी जाण्याचे बुकींग रद्द करण्यास सुरुवात केली आहे. तर काही जण बुकींग रद्द करण्याबाबत विचारणा करीत आहेत. विदेशात सहलीचे आयोजन करणारे ५० पेक्षा अधिक एजंट आहेत. तसेच मोठ्या कंपन्यांची बेळगावात कार्यालये आहेत. या सर्वांनी देशांतर्गत आणि विदेशातील टूर आयोजित केले आहेत. मात्र, कोरोना व्हायरसमुळे पर्यटका टूर रद्द करत आहेत. परिणामी, टूर्स ॲण्ड ट्रॅव्हल्स कंपन्यांकडून आता देशी पर्यटनावर भर दिला जाण्याची शक्‍यता आहे.

कोराेनाचा परिणाम दिसू लागला असून काही दिवसांपूर्वी करण्यात आलेले बुकिंग रद्द करण्यात आले आहे. दुबईसाठी ३०, नेपाळ २२ यांसह इतर ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांनी बुकिंग रद्द केले आहे. तर बुकिंगसाठी येणाऱ्या लोकांची संख्याही कमी झाली आहे.  
- प्रतीक गुरव, संचालक, हॉलिडे स्टोर इंडिया

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आनंदाची बातमी! नागरिकांना घरबसल्या मिळणार दस्ताची प्रमाणित प्रत; राज्यभर राबवण्यात येणार, नेमकी काय आहे सुविधा?

Mumbai Crime: मुंबईत रागातून २ अल्पवयीन मुलांनी मित्राला संपवलं, नंतर हातपाय धुवून मृतदेहाशेजारीच झोपले अन्...; कारण काय?

मीनाकुमारी मृत्यूच्या दारात असताना कुणीही केली नव्हती मदत; चाहत्याने भरलेलं हॉस्पिटलचं बिल

Shabbir Ahmed Ansari Passes Away: ओबीसी नेते शब्बीर अहमद अन्सारी यांचे निधन; मंत्री छगन भुजबळांसह ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेकडून शोक व्यक्त!

Solapur Textile Industry: सोलापूरच्या कापड उद्योगास ५०० कोटींचा फटका; कच्चा माल महागला अन् निर्यात विस्कळित; हजार डॉलरचे शिपमेंट ५ हजारांवर!

SCROLL FOR NEXT