Tourists will be attracted by the pool at the Ambabai temple
Tourists will be attracted by the pool at the Ambabai temple 
कोल्हापूर

अंबाबाई मंदिरातील कुंड घालणार पर्यटकांना भुरळ 

सकाळवृत्तसेवा

कोल्हापूर : पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीतर्फे अंबाबाई मंदिरातील मनकर्णिका कुंड खुले करण्याच्या कामाला आजपासून प्रारंभ झाला. 1958 साली हे कुंड बुजवले होते. मात्र, आता देवस्थान समिती ते पुन्हा खुले करणार आहे, यानिमित्ताने मंदिरातील तीर्थकुंड वैभव पुन्हा अनुभवायला मिळणार आहे. 

दरम्यान, खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते कामाचे भूमिपूजन झाले. ते म्हणाले,""देवस्थान समितीने चांगला निर्णय घेतला असून सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे या कामाला आता प्रारंभ झाला आहे. लवकरात लवकर हा प्राचीन ठेवा कोल्हापूरकराबरोबरच पर्यटकांसाठीही भुरळ घालणारा ठरेल, यात शंका नाही.'' 

देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव म्हणाले,""मनकर्णिका कुंडाला प्राचीन इतिहास असून अनेक ग्रंथांत त्याचा उल्लेख सापडतो. कुंडाच्या कामासाठी देवस्थान समितीने विशेष समिती स्थापन केली असून ही समिती या कामावर नियंत्रण ठेवणार आहे. तीन ते चार महिन्यांत हा कुंड भाविकांसाठी खुला केला जाईल.'' 

महापौर निलोफर आजरेकर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला. या वेळी आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, विरोधी पक्षनेते विजय सूर्यवंशी, नगरसेविका हसीना फरास, आदिल फरास, विनायक फाळके, देवस्थान समितीच्या खजानीस वैशाली क्षीरसागर, सदस्य शिवाजीराव जाधव, राजेंद्र जाधव, सचिव विजय पोवार, उपसचिव शीतल इंगवले, अभियंता सुदेश देशपांडे, सुयश पाटील, व्यवस्थापक धनाजी जाधव आदी उपस्थित होते. 

दृष्टिक्षेप 
- मनकर्णिका कुंड खुले करण्याच्या कामास प्रारंभ 
- 1958 साली बुजवण्यात आले होते कुंड 
- देवस्थानने स्थापन केलेली समिती ठेवणार कामावर लक्ष 
- तीन-चार महिन्यात खुले होणार कुंड 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : तुमची संपत्ती लुटणारं सरकार तुम्हाला हवं आहे का? पंतप्रधान मोदींची पुन्हा काँग्रेसवर टीका

Sangli Lok Sabha : 'जयंत पाटील काड्या करण्यात आणि संजय पाटील थापेबाजीत पटाईत'; माजी आमदाराची जोरदार टीका

Solapuri Chaddar : मोदींना गिफ्ट दिलेल्या सोलापुरी चादरीचा इतिहास माहित आहे का ?

Babil Khan: इरफान खानच्या लेकाचं होतंय कौतुक; पाण्याच्या समस्येसाठी काम करणाऱ्या संस्थेला केली मोठी आर्थिक मदत

Lok Sabha Election: PM मोदींच्या सभेमुळे ६ ठिकाणी वाहनतळ, ५ ठिकाणचे रस्ते बंद, २० मिनीटे अंत्ययात्रा रोखली

SCROLL FOR NEXT