Tractor scam in social welfare; Other people took the tractors for the backward classes 
कोल्हापूर

समाजकल्याणमध्ये ट्रॅक्‍टर घोटाळा ;  मागावर्गीयसांठीचे ट्रॅक्‍टर अन्य लोकांनी घेतले 

सदानंद पाटील

कोल्हापूर  : दलित वस्ती साकव योजनेत झालेल्या घोटाळ्यानंतर आता समाजकल्याण विभागाचा आणखी एक घोटाळा पुढे येत आहे. अनुसूचित जातीच्या बचत गटातील लोकांना शेत कामासाठी मिनी ट्रॅक्‍टर योजना घेण्यात आली, मात्र या 80 टक्‍के अनुसूचित जातीचे सभासद असलेल्या या गटावर इतर गटातील 20 टक्‍के लोकांनी लाभ मिळवत ट्रॅक्‍टर पदरात पाडून घेतले आहेत. 
एका कुटुंबातील अनेक लाभार्थ्यांनी हा लाभ घेतल्याचे निदर्शनास आल्यानंतर तीन ट्रॅक्‍टर जप्त केले आहेत. तक्रार आल्याने ही कारवाई झाली असली तर या घोटाळ्याची व्याप्ती मोठी आहे. 2012-13 पासून दिलेल्या लाभाची चौकशी करण्याची मागणी होत आहे. 

राज्य शासनाच्या समाजकल्याण विभागाकडून 2012-13 सालापासून मिनी ट्रॅक्‍टर ही योजना सुरू केली आहे. अनुसूचित जातीच्या बचत गटासाठी ही योजना सुरू केली. यात 80 टक्‍के अनुसूचित जातीचे तर 20 टक्‍के सभासद हे इतर प्रवर्गाचे असणे आवश्‍यक आहे. या योजनेतून आतापर्यंत 550 गटांना मिनी ट्रॅक्‍टरचा लाभ दिला आहे; मात्र बहुतांश अनुसूचित जातीच्या या गटात इतर 20 टक्‍के प्रवर्गातील लोकांनीच या योजनेचा लाभ घेतला आहे. अशीच तक्रार आल्यानंतर समाजकल्याण आयुक्‍त कार्यालयातून चौकशी झाली. 

धक्कादायक माहिती पुढे : 
* ट्रॅक्‍टर घोटाळ्याच्या चौकशीअंती एकाच कुटुंबातील सदस्यांना ट्रॅक्‍टरचे वितरण 
* ट्रॅक्‍टरचा लाभ गटातील इतर लोकांना न मिळणे 
* गटाचे अध्यक्ष व प्रमुख पदांवर इतर प्रवर्गातील सदस्यांची वर्णी 
*तक्रार व चौकशीच्या आधारे समाजकल्याण विभागाने तीन ट्रॅक्‍टर जप्त 


ही ट्रॅक्‍टरची योजना ही मागासवर्गीय समाजासाठी आहे. या योजनेतून ट्रॅक्‍टर घेताना एक चतुर्थांश रक्‍कम ही गटाला भरावी लागते, मात्र समाजातील लोक ही रक्‍कम भरू शकत नसल्याने समाजाबाहेरील लोकांकडून ही रक्‍कम घ्यावी लागते; मात्र ही रक्‍कम दिल्याने या लोकांचा योजनेवर ताबाच आहे. गटातील लोकांना या ट्रॅक्‍टरचा लाभच होत नाही. त्यामुळे ही योजना 100 टक्‍के अनुदानातून द्यावी. योजनेचा गैरवापर करणाऱ्या लाभार्थ्यांचे ट्रॅक्‍टर जमा करून दोषी अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी. 
- सुभाष देसाई, अध्यक्ष, ब्लॅक पॅंथर. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhagyashree Patwardhan : अभिनेत्री भाग्यश्रीने आरती केली, विजयसिंहराजेंचा लेकीसोबतचा वाद पुन्हा उफाळला; राजवाड्याच्या दरबार हॉलमध्ये काय घडलं?

Pune News: महसूल विभागात खळबळ! जमिनींवर परस्पर कुळ लावल्याच्या तक्रारी; राज्यभरातील मंजूर प्रकरणांची तपासणी, महसूलमंत्र्यांनी काय दिले आदेश?

Shirdi Temple: साई चरणी १९ लाखांची सोन्याची छत्री, १ कोटी २० लाखांचा चांदीचा नंदी; गणेश चतुर्थीच्या दिवशी भाविकांकडून अर्पण

Latest Marathi News Update : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गणपती आगमन सोहळा मिरवणुकीला गालबोट, दोघांचा अपघाती मृत्यू

Maharashtra Weather : राज्यात विजांसह पावसाची शक्यता; पुढील ५ दिवसांचा हवामान अंदाज

SCROLL FOR NEXT