0
कोल्हापूर

कागल तालुक्यात ट्रॅक्‍टर ट्रॉलीसह उलटून मजूर महिला ठार, 13 जखमी 

प्रकाश कोकितकर

सेनापती कापशी (ता. कागल) : कोल्हापूर जिल्ह्यातील काळम्मा बेलेवाडी व वडगाव दरम्यान बुधवारी सकाळी झालेल्या ट्रॅक्‍टर अपघातात ऊस तोडणी महिला मजूर ठार झाली. अपघातात 13 जण जखमी झाले. त्यापैकी त्यातील एक तरुण गंभीर जखमी आहे. जखमींना गडहिंग्लज येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. अपघातानंतर चालक पळून गेला. 

कागल येथील छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याच्या ऊस तोडणी मजुरांची टोळी सकाळी दहाच्या सुमारास काळम्मा बेलेवाडी येथून कसबा सांगावकडे रामगोंड आरगोंड पाटील (रा. कोगनोळी, ता. चिक्कोडी) यांच्या मालकीच्या ट्रॅक्‍टर (एमएच 09 ए सी 7302) मध्ये दैनंदिन प्रापंचिक साहित्यासह जात होती. आठ कुटुंबांतील 21 मजूर व त्यांची मुले होती. वडगाव हद्दीत साबळे वस्तीजवळ चालकाचे ट्रॅक्‍टरवरील नियंत्रण सुटले. ट्रॅक्‍टर ट्रॉलीसह रस्ता पार करून शेतात जाऊन उलटला. ट्रॅक्‍टर आणि ट्रॉलीखाली मजूर अडकले. काही फेकले गेले. मजुरांचा आरडाओरडा ऐकून जवळपासचे लोक धावले. अपघातात रुक्‍मिणी दिगंबर खांडेकर (वय 25 रा. ईळगाव ता. गंगाखेड, जि. परभणी) आणि मच्छिंद्रनाथ गुळवे गंभीर जखमी झाले. दहा जणांना हात, पाय, कंबर, डोळे अशा ठिकाणी गंभीर दुखापत झाली. 

याची माहिती मिळताच शाहू कारखाना प्रशासनाने अधिकारी व कर्मचारी, तसेच वडगाव व काळम्मा बेलेवाडीचे लोक मदतीसाठी धावून गेले. ट्रॅक्‍टरखाली अडकलेल्या मजुरांना बाहेर काढले. यासाठी नेताजी साबळे यांचे दोन ट्रॅक्‍टर आणि सूरज चव्हाण यांनी जेसीबीची मदत झाली. मदत कार्यात अक्षय साबळे, सूरज साबळे, धनाजी नार्वेकर, प्रमोद सुतार, बाळकृष्ण पाटील, सूरज पाटील, हणमंत मुंढे आदींनी सहभाग घेतला. 

सर सेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना व कापशी आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेतून जखमींना गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. येथे उपचारादरम्यान खांडेकर यांचा मृत्यू झाला. मच्छिंद्र गुळवे गंभीर जखमी आहे. त्याला तातडीने कोल्हापूर सीपीआरमध्ये हलविण्यात आले. उर्वरित 16 जखमी मजूर गडहिंग्लज येथे उपचार घेत आहेत. 

संपादन : विजय वेदपाठक
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Lok Sabha : 'जयंत पाटील काड्या करण्यात आणि संजय पाटील थापेबाजीत पटाईत'; माजी आमदाराची जोरदार टीका

Babil Khan: इरफान खानच्या लेकाचं होतंय कौतुक; पाण्याच्या समस्येसाठी काम करणाऱ्या संस्थेला केली मोठी आर्थिक मदत

Lok Sabha Election: PM मोदींच्या सभेमुळे ६ ठिकाणी वाहनतळ, ५ ठिकाणचे रस्ते बंद, २० मिनीटे अंत्ययात्रा रोखली

Mumbai Crime News: मानखुर्दमध्ये २७ वर्षीय तरुणीची हत्या; 'लव्ह जिहाद' म्हणत धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न

Latest Marathi News Live Update : तुमची संपत्ती लुटणारं सरकार तुम्हाला हवं आहे का? पंतप्रधान मोदींची पुन्हा काँग्रेसवर टीका

SCROLL FOR NEXT