Traders, entrepreneurial businesses are being affected because of korana in kolhapu 
कोल्हापूर

कोरोनाचा कोल्हापूरला असा हा फटका....

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - कोरोनाच्या धास्तीमुळे चीनवरून होणारी वस्तूंची वाहतूक थंडावली आहे. यातून व्यापारी, उद्योजकीय उलाढालीवर परिणाम होत आहे. महिन्याभरापासून इलेक्‍ट्रॉनिक्‍स बाजारपेठेत उपकरणे सजावटीच्या साहित्यापासून ते फौंड्री उद्योगातील माल वाहतूक थांबली आहे. त्याचा अर्थव्यवस्थेवरही परिणाम होण्याची शक्‍यता आहे. अशात औषध साठा मात्र सहा महिने पुरेल एवढा असल्याने तेवढीच तूर्त दिलाशाची बाब असल्याचे मत व्यापारी, उद्योजकांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केले.

उद्योजक आनंद माने, म्हणाले, ‘‘इलेक्‍ट्रॉनिक्‍स वस्तू, उपकरणे, खेळणी, एलईडी बल, सजावटीचे साहित्य, शोभेच्या वस्तू चायनीज वस्तूंची आवक पूर्णतः घटली आहे. काही वस्तूंचा तुटवडा जाणवत आहे. त्याचे भाव वाढत आहेत. त्यासोबत सर्वात मोठा फटका विदेशी पर्यटनाला बसला आहे. जगभरातून येणाऱ्या पर्यटकांची संख्या रोडावत आहे. थोड्याफार फरकाने अशीच स्थिती बांधकाम व्यवसायात विशेषतः फरशा व अन्य साहित्याचे कंटेनर आलेले नाहीत. संशयितांची संख्या वाढल्यास यावर परिणाम होऊ शकेल.’’

चेंबर्स ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे म्हणाले, ‘‘औषधे कच्चा माल तसेच फर्निचरच्या साधनांची चीनमधून होणारी आवक थांबली आहे. यापूर्वी ऑर्डर नोंदवल्या होत्या; पण त्यानुसार साधनसामुग्री आलेली नाही. पंधरा-वीस दिवस परिणाम जाणवू लागतील, अशी स्थिती आहे.’’ 

मार्व्हलस इंजिनियर्स व्यवस्थापकीय संचालक संग्राम पाटील, म्हणाले, ‘‘चीनवरून भारतात होणारा औद्योगीक फिनिश उत्पादनांचा पुरवठा व त्याची वाहतूक थांबली आहे. जिथका साठा येथे उपलब्ध आहे, त्यावर सध्या गरज भागविली जात आहे. तसेच कच्चा माल, फौंड्रीपूरक उत्पादने पाठवली जात होती, तेही थांबले आहे. चीनवरून फौंड्रीसाठी लागणारी रसायने येत होती. तेही थांबले आहे. त्याचा फौंड्री व मशीन शॉपवरही परिणाम जाणवत आहे. कोरोनाची चिंता वाढल्याने व्यावसायिक ऑर्डर निश्‍चित करण्याची प्रक्रिया थांबली आहे. ’’ 

जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे मदन पाटील म्हणाले, ‘‘आपल्याकडे औषध साठा पुरेसा आहे. तो आणखी सहा महिने पुरू शकेल. सध्याचा औषधासाठा संपल्यानंतर औषधांचे दरवाढ वाढण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. चीनवरून औषधांसाठीचा कच्चा माल येतो तो थांबला आहे. सद्यःस्थितीत साठा अजूनही शिल्लक आहे.’’
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BCCI statement on India vs Pakistan match: मोठी बातमी! भारत-पाकिस्तान मॅचबद्दल अखेर 'BCCI'ने स्पष्ट केली भूमिका

Sanjay Raut : आरक्षणावरून राज्यात अराजक; मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट करावी

PM Modi AI video: पंतप्रधान मोदी अन् त्यांच्या आईंचा 'AI' व्हिडिओ प्रकरणी, आता काँग्रेस 'IT' सेलच्या नेत्यांविरुद्ध 'FIR' दाखल!

Umarga News : आरक्षण मिळावे या मागणीसाठी बंजारा समाजातील तरुणाने संपविले जीवन

Heavy Rain : शेलगाव (ज.) मध्ये ढगफुटी सदृश्य पावसाने धुमाकूळ; लोकांच्या घरात शिरले पाणी

SCROLL FOR NEXT