Traders Should Not Be Forced To Swab, Demanded In Chandgad Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

व्यापाऱ्यांना स्वॅबसाठी सक्ती नको, "या' शहरात केली मागणी, तहसीलदारांना निवेदन

सुनील कोंडुसकर

चंदगड : शहरातील व्यापाऱ्यांच्या स्वॅब तपासणीबाबत महसूल प्रशासनाने आज सक्तीचे पाऊल उचलले आणि व्यापारी वर्गातून त्याचे संतप्त पडसाद उमटले. प्रशासनाने व्यापाऱ्यांना स्वॅब तपासणीसाठी सक्ती करू नये, अशा आशयाचे निवेदन येथील बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी तहसीलदारांना दिले.

कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनावर जबाबदारी आहे. त्या अनुषंगाने काही निर्णय घेण्यात आले आहेत. त्यामध्ये बाजारपेठेतील सर्व व्यापाऱ्यांची तपासणी करण्यात येणार होती. येथील महसूल प्रशासनाने दोन पोलिस व नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांचे पथक तैनात करून व्यापाऱ्यांना तपासणीसाठी सक्ती केली. काही व्यापाऱ्यांना सक्तीने गाडीत घालून तपासणीसाठी नेण्यात आले; मात्र त्याचे संतप्त पडसाद उमटले.

प्रशासनाने कोरोना रोखण्यासाठी ज्या ज्यावेळी बंदचे आवाहन केले त्या त्यावेळी व्यापाऱ्यांनी प्रतिसाद दिला आहे. नुकताच तालुकास्तरावर 10 ते 17 तारखेदरम्यान बंदचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यालाही आमची तयारी असल्याचे व्यापाऱ्यांनी निवेदनात म्हटले आहे. ज्या व्यापाऱ्यांना कोरोनाची लक्षणे जाणवत असतील त्यांची तपासणी करण्यात यावी; मात्र सर्वांना सक्ती करू नये, अशी मागणी निवेदनातून केली आहे. निवेदनावर अनिकेत घाटगे, संतोष गावडे, संजय ढेरे, प्रवीण नेसरीकर, रब्बानी मुल्ला, नियाज मदार, अमोल हुंबरवाडी, सुनील हाळवणकर, निखिल राजापूरकर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. 

संपादन - सचिन चराटी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijeet Dipke MPSC : धर्म-जातीच्या नावावर मत मागता, पण शिक्षणाचं काय?’; पुण्यातील एमपीएससी आंदोलनात अभिजीत दिपकेंचा सवाल

GST Council : GSTचे नियम बदलणार? 9 गुन्हे वगळण्याचा प्रस्ताव, अटक प्रक्रियेतही मोठी सुधारणा होण्याची शक्यता

IND vs WI, Schedule: वनडे मालिका संपली, आता ५ सामन्यांची T20I मालिका होणार सुरू; संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : देश-विदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

किटलीशिवाय कप-बशी भरणार नाही; शिट्टीपासून सावध राहा; सोमेश्वर निवडणुकीत युगेंद्र पवारांचे सूचक आवाहन

SCROLL FOR NEXT