the tradition of maratha community to celebrate diwali with son in law and gift to both in sangli 
कोल्हापूर

जावयांना आले सुगीचे दिवस

गजानन पाटील

पेड (सांगली) : पंचपर्व दिवाळी हा भारतीयांचा मोठा सण. दिवाळीचा सण मोठा, नाही आनंदाला तोटा असं म्हटंल जात. दरम्यान दिवाळीपूर्वी लग्न आटोपलेल्या नवविवाहितांची ही पहिलीच दिवाळी असते. भारतीय परंपरा व संस्कृती प्रमाणे नवीन जावयाची पहिली दिवाळी ही बायकोच्या माहेरी साजरी व्हावी अशी प्रथा आहे. मुलगी आणि जावई या दोघांना जोडीने आपल्या घरी बोलावून भेट वस्तू देण्याची पूर्वापार परंपरा चालत आलेली आहे. ती परंपरा आजही जोपासली जात आहे. 

लग्नावेळी देण्यात आलेल्या भेटवस्तुत झालेल्या कमतरतेची कसर सासरेबुवा पहिल्याच दिवाळीत पूर्ण करण्याचा हमखास प्रयत्न करतात. कारण जावयाने आपल्या मुलीला सुखात ठेवावे हा त्यामागचा हेतू असतो. काटकसर करून जावयाला पहिल्या दिवाळीची भेटवस्तू देण्यात सासरेबुवा मागेपुढे पहात नाहीत. पहिल्या दिवाळीत मुलगी आणि जावयाला नवीन कपडे भेटवस्तू देऊन त्यांचा यथोचित सन्मान करणे इत्यादी गोष्टी आजही ग्रामीण व शहरी भागात केल्या जातात.आता नवीन जावई घरी आला की, त्याचे कौतुक करीत इथे बसवू की, तिथे बसवू असे सासरकडील मंडळींना वाटणे साहजिकच आहे. 

पूर्वीच्या काळी जावयाला त्याच्या घरातून नेण्यासाठी सासरकडील मंडळी यायची. पूर्वी प्रवासाची साधने कमी असल्याने बैलगाडी किंवा अन्य वाहतुकीच्या साधने उपलब्ध असतील त्यातून मुलगी व जावयाला सन्मानाने घरी आणले जायचे. आता मात्र वाहतुकीची व दळणवळणाची साधने वाढली आहे. जावयाला सासऱ्याकडून फोनद्वारे तोंडी निमंत्रण दिले जाते. जावई, मुलगी पहिल्याच दिवाळीसाठी सासरी येतात. ठरलेल्या धार्मिक विधी पार पाडून जावई मुलीला बरोबर घेऊन लगेच परत जातो.

आता पूर्वीसारखी जावई घरी आल्याची गावात चर्चा किंवा गाजावाजा होत नाही. स्वाभिमानी नोकरी, व्यवसाय असणारा परिश्रमाला प्राधान्य देणारा जावई दुसऱ्याच दिवशी पत्नीला घेऊन घरी परततो. आजही अनेक ठिकाणी जावयाला पहिल्या दिवाळीला भेटवस्तू देऊन त्याचा मानपान करण्याची परंपरा संस्कृतीचा भाग म्हणून अनेकांनी जपून ठेवली आहे.  

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sant Dnyaneshwar Maharaj palkhi: ज्ञानेश्वर माउली पालखी रथ बैलजोडीवरून वाद; रानवडे कुटुंबीयांना मान, मात्र देवस्थानचे पत्र नाही

Maharashtra Monsoon Update : मॉन्सूनची कोकणात दमदार एन्ट्री! राज्यातील 'या' २६ जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी

Ancient Heritage Discovery : भुदरगड तालुक्यात सापडला मध्ययुगीन काळातील दुर्मीळ ठेवा; ज्योतिर्लिंग मंदिराबाहेर आढळल्या गूढ शिळा, शेकडो वर्षांपूर्वीचा इतिहास उजेडात

Abhijit Deepke: शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याशिवाय थांबणार नाही: अभिजित दीपके, कोणावर तरी जबाबदारी निश्चित करावीच लागणार

Monsoon Alert: मॉन्सूनचा वेग मंदावणार; १५ जूनपर्यंत पेरणीची घाई टाळा, शेतकऱ्यांना सरकारचा इशारा

SCROLL FOR NEXT