Transactions At Full Capacity For The First Time Since The Lockdown In Ajara Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

लॉकडाऊननंतर प्रथमच आजऱ्यात क्षमतेने व्यवहार

रणजित कालेकर

आजरा : कोरोनाच्या लॉकडाऊन नंतर आजरा शहरात तिसरा आठवडी बाजार भरला. बाजारात भाजीपाला व फळांची मोठी आवक झाली. गेले आठ महिने भाजीपाल्याचा दर सर्वसामान्यांच्या आवक्‍यात नव्हता मात्र आवक वाढल्याने आठवडी बाजारात ग्राहकांचा भाजीपाला खरेदीकडे कल दिसून आला. लॉकडाऊननंतर प्रथमच आजऱ्यात पूर्ण क्षमतेने  व्यवहार झाले.

अचानक उद्‌भवलेल्या कोरोनाच्या संकटामुळे सर्वच व्यवस्था कोलमोडून पडली होती. संचारबंदीमुळे नागरीकांना घराबाहेर पडणे अवघड बनले होते. यातच आठवडी बाजार देखील रद्द करण्यात आल्याने सर्वसामान्यांची मोठी कुचंबणा झाली होती. अनेकांनी गावोगावी भाजीपाला विक्रीचा व्यवसाय सुरु केला. मात्र लॉकडाऊनमुळे या भाजीपाल्याची विक्री चढ्या भावाने होत होती. यामुळेच सर्वसामान्य मेटाकुटीला आले होते.

दोन महिन्यांपुर्वी शासनाने आठवडी बाजार सुरु करण्यास परवानगी दिली. मात्र आजऱ्याचा आठवडी शुक्रवारचा बाजार सुरु झालेला नव्हता. दोन आठवड्यापुर्वी तो सुरु करण्याबाबत नगरपंचायतीने हिरवा कंदील दिला. तरीही गेल्या दोन बाजारात आवक कमीच होती. आजच्या तिसऱ्या बाजारापासून भाजीपाल्याची आवक वाढली आहे. आता सर्वसामान्यही पुन्हा एकदा आठवडी बाजारात मोठ्या प्रमाणात हजेरी लावत आहेत. 

बाजारात टोमॅटोचा 15 रुपये तर, कोबी व फ्लॉवरचा दर 10 रुपये होता. हिरवा वाटाणा, गाजर, वेलवर्गीय दोडके, घेवडा या भाज्यासह दोडका, कारली त्याचबरोबर फळभाज्याची मोठी आवक झाली. मेथी व कोंथींबरीचे दर उतरले होते. फळबाजारात परदेशी सफरचंदाला मागणी चांगली राहिली. संत्र्याचे दरही घसरले होते. 

लाल घेवड्याला मागणी 
गेले दोन बाजारात लाल घेवडा या वेलवर्गीय भाजीची मागणी मोठी राहिली आहे. आवक कमी असल्याने या भाजीचा दर वधारला होता. 80 रुपये किलो दराने याची विक्री सुरु होती. हातोहात ही भाजी संपल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. 

संपादन - सचिन चराटी

kolhapur

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market: शेवटच्या तासात शेअर बाजाराचा यू-टर्न! घसरणीनंतर सेन्सेक्स वाढीसह बंद; तर निफ्टी...; वाचा बाजाराची स्थिती

Health and Safety : गरजूंना कृत्रिम अवयव मिळणार खासदार सोनवणेंचा पुढाकार; १८ जुलैपासून शिबिर

Hotel Bhaghyashree: 'हॉटेल भाग्यश्री'च्या मालकाने घेतला मोठा निर्णय; कोट्यवधी रुपयांची केली गुंतवणूक, हॉटेल बंद...

Pune News: कोथरुडमधील आजी-आजोबांच्या वडापाव गाडीवर महापालिकेचा अन्याय, तोंडचा घास हिरावणारी कारवाई

प्राजक्ताने खरेदी केली अलिशान गाडी! व्हिडिओ शेअर करत म्हणाली...'आई शप्पथ! लई भारी वाटतंय स्वप्न पुर्ण होताना..'

SCROLL FOR NEXT