Transfer of Kolhapur Municipal Commissioner Mallinath Kalshetti 
कोल्हापूर

ब्रेकिंग - कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी यांची बदली 

डॅनियल काळे

कोल्हापूर - कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांची बदली झाली आहे. त्याबाबतचे आदेश महानगरपालिकेला नुकतेच प्राप्त झाले आहेत. आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या जागी नूतन आयुक्त म्हणून कादंबरी बलकवडे यांची नियुक्ती  झाली आहे. बलकवडे या गोंदियाच्या जिल्हाधिकारी होत्या. त्या कोल्हापूरचे पोलिस  अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या पत्नी आहेत.  

बदली आदेश प्राप्त झाले असले तरी कलशेट्टी यांच्या बदलीचे ठिकाण अजून ठरले नाही. फेब्रुवारी 2019 मध्ये महापालिका आयुक्त म्हणून डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी कोल्हापूर महापालिकेत रुजू झाले. आलेल्या पहिल्या रविवारपासून त्यांनी स्वच्छता मोहिमेला सुरुवात केली. प्रत्येक रविवारी महापालिका आणि विविध सामाजिक संघटनांच्या मदतीने शहरात स्वच्छता मोहीम घेत होते. गेल्या रविवारी 75 वी मोहीम झाली. स्वच्छता मोहिमेचा अमृतमहोत्सव साजरा केला. विशेष म्हणजे 2019 च्या महापुरामध्ये या स्वच्छता मोहिमेचा मोठा फायदा झाला. कोरोना काळातही मल्लिनाथ कलशेट्टी यांनी चांगले काम केले आहे. 

 संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhananjay Mahadik Criticises Rahul Gandhi : धनंजय महाडिकांचा राहुल गांधींवर हल्लाबोल; म्हणाले, 'निवडणूक आयोगाबद्दल चुकीची माहिती पसरवून दिशाभूल सुरू'

ICC Cricket World Cup 2027: वर्ल्ड कप 2027 चं शेड्यूल कधी जाहीर होणार? अनाउन्समेंटची तारीख समोर; जाणून घ्या कुठे होणार घोषणा

बॉलिवूडला दणका! चित्रपट निर्माते 'प्राप्तिकर'च्या रडारवर, अनेक दिग्गज सेलिब्रिटींवरही कारवाई

Marathi News Live Updates: मातंग समाजाचा मुंबईत मोर्चा; सीएसएमटी ते मंत्रालय मार्गावर रस्ता अडवण्याचा प्रयत्न, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड

Jan Shatabdi: जनशताब्दी एक्स्प्रेसमध्ये तांत्रिक बिघाड, 3 तासांपासून एकाच ठिकाणी ठप्प; प्रवाशांचा खोळंबा

SCROLL FOR NEXT