transfer of teachers are started from december it's beneficial for teachers in belgaum 
कोल्हापूर

शिक्षक बदली प्रक्रियेचा मुहूर्त डिसेंबरला ; वेळापत्रक जाहीर

मिलिंद देसाई

बेळगाव : शिक्षकांच्या बदली  प्रक्रियेला अखेर मुहूर्त मिळाला असून डिसेंबर महिन्याच्या 16 तारखेपासून  परस्पर, अतिरिक्त आणि सक्तीची बदली प्रक्रिया पार पडणार आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून बदलीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला आहे. बदली प्रक्रिया लवकर राबवावी अशी मागणी सातत्याने शिक्षकांमधून होत होती.

मात्र बदली प्रक्रिया राबविण्यात येत नव्हती. त्यामुळे बदली प्रक्रियेचे वेळापत्रक लवकर जाहीर करावे या शिक्षकांच्या मागणीमुळे याची दखल घेत बदली प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. 16 व 17 डिसेंबर रोजी प्राथमिक तर 18 ते 19 रोजी सरकारी माध्यमिक शाळांमधील शिक्षकांच्या बदलीसाठी कौसिलिंग पार पडेल. याबाबत 17 नोव्हेंबर रोजी शिक्षकांची यादी जाहीर करण्यात येणार आहे. 

गेल्या वर्षी शहरात 10 वर्षांपेक्षा अधिक दिवस सेवा बजावलेल्या शिक्षकांना सक्तीच्या बदलीला सामोरे जावे लागले होते, मात्र यावेळी हा नियम लागू होणार नाही. बदलीसाठी शिक्षकांना ऑनलाइन अर्ज करावा लागणार असून अधिक माहितीसाठी शिक्षण खात्याच्या संकेतस्थळावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

"बदली प्रक्रियेला चालना मिळाली असून शिक्षकांना बदलीसाठी ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. बदली प्रक्रिया शिक्षक स्नेही व्हावी यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत."

- अण्णाप्पा पॅटी, शिक्षणाधिकारी

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhuloba Ramling Devasthan : कोल्हापुरातील हातकणंगले धुळोबा रामलिंग देवस्थानाकडे जाणारा रस्ता रात्रीतून जेसीबीने उकरला; भाविकांमध्ये संताप

Beyond the Hype AI : एआयच्या युगात भारताची भूमिका दुय्यम राहणार? नवोन्मेष आणि संशोधनाची गरज सांगणारे पुस्तक चर्चेत

'हट ना बे...'करीना कपूरने प्रेग्नेंसीच्या चर्चेवर दिलं उत्तर; म्हणाली, ‘तुम लोग तो...’ Viral Video

New Marathi Books : मराठी वाङ्‍मयाचा वारसा आणि वर्तमान ; दुर्मीळ ग्रंथ, ध्यानमार्गदर्शन व स्त्रीमनाच्या कवितांचा नवा पुस्तकमेळा

Marathi News Live Updates : संरक्षण मंत्रालयातील महिला अधिकाऱ्याच्या संशयास्पद मृत्यूचा दिल्ली पोलीसांकडून सखोल तपास सुरू

SCROLL FOR NEXT