Transport professional corona positive in top kolhapur 
कोल्हापूर

टोप मधील 'तो' ट्रान्स्पोर्ट व्यावसायिक कोरोना पाॅझिटीव्ह...

युवराज पाटील

टोप - येथील महाडिक कॉलनीतील ५८ वर्षीय ट्रान्स्पोर्ट व्यावसायिकाचा कोरोनाचा रिपॉर्ट पॉझिटीव्ह आला आणि टोप मध्ये कोरोनाचा शिरकाव झाला. त्यामुळे गावात घबराट पसरली असून, आज सकाळी ग्रामपंचायतीने महाडिक कॉलनी परिसर तातडीने सील केला आहे. तसेच टाेप गाव सात दिवसांसाठी पूर्णपणे लॉकडाऊन करण्याचा निर्णय टाेप कोरोना दक्षता समिती व प्रशासनाने घेतला.

हा रुग्ण ट्रान्सपोर्ट व्यावसायिक आहे. त्यामुळे त्यांचा संपर्क कोणत्या मार्गे झाला हे शोधण्याचे काम प्रशासन करत आहे. तसेच ते उद्यमनगर, गांधीनगर, गोकुळ शिरगाव याठिकाणी फिरल्याचे कळते तर १ तारखेला उद्यमनगर येथील एका खासगी डॉक्टरकडून दोन दिवस उपचार घेतले आहेत. त्यानंतर ३ तारखेला दोन दिवस गावातील एका हॉस्पिटलला दाखवले.

त्यानंतर येथेही बरे वाटत नसल्याने ते पेठ वडगाव येथील एका हॉस्पिटलमध्ये चेक केले असता त्यांना ताप जास्त असल्याने कोल्हापुरला जाण्यास सांगितले. तिथे त्यांची कोरोना टेस्ट केली असता आज रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे सर्वानाच धक्का बसला आहे. त्यांच्या घरी तीन लोक आहेत. दरम्यान, परिसरात  ग्रामपंचायतीने औषध फवारणीचे काम सुरु केले आहे. तर टोप गाव सात दिवस बंद करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. या परिसरात आशा सेविका, आरोग्य अधिकारी यांनी सर्व्हे सुरू केला आहे.

संपादन - मतीन शेख

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Independence Day Live Update : जागतिक बाजारपेठेत भारतीय उत्पादनांसाठी मोठी संधी; लघु उद्योगांना पंतप्रधान मोदींचे आवाहन

Mumbai Local Megablock: मुंबईकरांसाठी महत्त्वाचे! रविवारी लोकल उशिराने धावणार, 'या' मार्गावर मेगाब्लॉक; कसे असेल नियोजन?

Koyna Dam Water Level : महाराष्ट्राची 'भाग्यलक्ष्मी' 100 टीएमसीच्या उंबरठ्यावर! कोयना धरणात 97 टीएमसी पाणीसाठा; सांगली-सातारा अन् कर्नाटकाची चिंता मिटली

IND vs SL: भारत खेळणार 600वा कसोटी सामना; ‘या’ दोन संघांनंतर ऐतिहासिक क्लबमध्ये होणार एंट्री, कोणत्या देशाने खेळले 1000हून अधिक सामने!

Vishwas Nangare Patil: विश्‍वास नांगरे पाटील यांना अतिउत्कृष्ट सेवा पदक, रेड्डींसह दहा पोलिस होणार सन्मानित

SCROLL FOR NEXT