रेल्वे, विमानसेवा कधी होणार सुरु...? 
कोल्हापूर

रेल्वे, विमानसेवा कधी होणार सुरु...?

सकाळवृत्तसेवा

बेळगाव - देशात कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. यासाठी केंद्र सरकारकडून ठोस पावले उचलली जात आहेत. कोरोनावर निर्बंध यावा यासाठी केद्र सरकारकडून दुसरा लॉकडाऊन संपण्याच्या दोन दिवस आधीच तिसरा लॉकडाऊन 17 मे पर्यंत वाढविण्याची घोषणा करण्यात आली. यामुळे देशातील वाहतूक सेवाही बंद असणार आहे. यामध्ये रेल्वे आणि विमानसेवेचाही समावेश असणार आहे.

देशभरात यापूर्वी 3 मे पर्यंत लॉकडाऊन होता. लॉकडाऊन उठल्यानंतर 4 मे पासून रेल्वे व विमान सेवा सुरु होणार असल्याची चर्चा होती. मात्र, केंद्र सरकारने लॉकडाऊन वाढविल्याने 17 मे पर्यत या सेवा बंदच असणार आहेत. यामुळे देशाअंतर्गत व विदेशातील सर्व विमानसेवा व देशातील प्रवासी रेल्वेसेवा 17 मेपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत. पुढील आदेश येईपर्यंत ऑनलाईन व ऑफलाईन तिकीट सेवा बंद राहणार आहेत.

देशभरात कोरोनामुळे खबरदारी म्हणून 21 मार्चपासून रेल्वे व विमानसेवा पूर्ण बंद आहे. तसेच पहिल्या टप्यात 24 मार्चपासून 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. दुसऱ्या टप्यात 3 मे पर्यंत देश लॉकडाऊन असल्याची घोषणा करण्यात आली.तरीही कोरोणाचा प्रादुर्भाव वाढतच असल्याने तिसऱ्या टप्यात 17 मे पर्यंत देश बंदच असणार आहे .यामुळे या कालावधीत देशातील रेल्वे व विमान सेवा बंदच असणार आहे.

लॉकडाऊन काळात सर्व विभागात हवाई वाहतूक, रेल्वेसेवा, मेट्रो या सेवा बंद असणार आहेत. पुढील आदेश होईपर्यंत ई-तिकिटांसह कोणत्याही प्रकारचे बुकींग केले जाणार नाही. तिकीट बुकींग ऑनलाईन रद्द करण्याची सुविधा कार्यरत राहील. यापूर्वी रद्द झालेल्या गाड्यांचा परतावा रेल्वेकडून ग्राहकांना स्वयंचलितपणे ऑनलाईन मिळेल तर ज्यांनी काऊंटरवर बुकिंग केली आहे त्यांना 31 जुलैपर्यंत परतावा मिळेल. असे आवाहन रेल्वेतर्फे करण्यात आले आहे.

विमानसेवा सुरु करण्यासंबंधी कोणताही आदेश आलेला नाही. यामुळे लॉकडाऊन असेपर्यंत विमानसेवा बंदच असणार आहे. विमानतळावर सोशल डिस्टसिंग पाळले जात आहे. विमानतळ परिसर निर्जंतुकीकरण केला आहे. आवश्‍यक ती खबरदारी घेतली जात आहे.
- राजेशकुमार मौर्य, संचालक, सांबरा विमानतळ, बेळगाव

देशात लॉकडाऊन वाढविण्यात आला आहे. यामुळे सर्व प्रवासी रेल्वेसेवा 17 मे पर्यंत बंद असणार आहेत. राज्य सरकारच्या सुचनेनुसार विशेष रेल्वेगाड्या सुरु केल्या जातील. तसेच मालवाहतूक व पार्सल रेल्वे सेवा सुरु राहिल.
- इ विजया, मुख्य जनसंपर्क अधिकारी, नैर्ऋत्य रेल्वे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik UPSC Exam: दोन मिनिटे उशीर अन् UPSC परीक्षा हातातून गेली! नाशिकमध्ये विद्यार्थी-पालक आक्रमक! खड्डे, पाऊस, ट्रॅफिकचा फटका

Mumbai Rain: मुंबईला पुढील 48 तास धोक्याचे! गणरायाच्या आगमनापूर्वी पावसाचा अलर्ट, हवामान खात्याकडून मोठी अपडेट

US Open Final: अल्काराझला हरवलं, टियाफोलाही धुतलं! बेन शेल्टन US Openच्या फायनलमध्ये; २२ वर्षांनंतर अमेरिकेचा खेळाडू इतिहास रचणार?

Marathi News Live Updates : दगडूशेठ गणपती मंडळाची जय्यत तयारी पूर्ण, वृंदावनच्या प्रेम मंदिराची भव्य प्रतिकृती ठरणार यंदाच्या मिरवणुकीचे आकर्षण

BRICS Dinner: शी जिनपिंग मोदींच्या मेजवानीला गैरहजर; पुतिनसह ब्रिक्स नेत्यांनी घेतला भारतीय शाकाहारी पदार्थांचा आस्वाद, मेनू काय होता?

SCROLL FOR NEXT