Travelers turned around towards Pune-Mumbai kolhapur marathi news 
कोल्हापूर

कोरोनाच्या भितीने प्रवाशांनी फिरविली पुण्या-मुंबईकडे पाठ...

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : पुणे-मुंबईमध्ये कोरोना व्हायरसचे संशयित रुग्ण आढळल्याचा फटका रेल्वेलाही बसला आहे. यामुळे कोल्हापुरातून पुणे-मुंबईला जाणाऱ्या अनेक प्रवाशांनी आरक्षण रद्द केले आहे. त्यामुळे कोल्हापूर रेल्वे प्रशासनाकडून रोज किमान दीड लाख रुपये प्रवाशांना परत द्यावे लागत आहेत.

आगाऊ आरक्षणही रद्द
कोरोना व्हायरस संसर्गजन्य आजार असल्यामुळे अनेकांनी त्यापासून दूर राहण्याची खबरदारी घेतली आहे. प्रशासनानेही गर्दीच्या ठिकाणी न जाण्याचे आवाहन केले आहे. पुणे आणि मुंबईत संशयित रुग्ण आढळले आहेत. ज्या संशयित दाम्पत्याला टॅक्‍सीतून रुग्णालयात नेले त्या चालकालाही संसर्ग झाला आहे. परिणामी पुण्या-मुंबईतील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात कोरोनाची धास्ती घेतली आहे. 

पुण्या-मुंबईकडे प्रवाशांनी फिरविली पाठ
पुण्या मुंबईला जाण्याचे कोल्हापूरकर टाळत आहेत. त्यामुळेच अनेक प्रवासी रोज आरक्षण रद्द करीत आहेत. त्यामुळे काल आणि आज रेल्वे प्रशासनाकडून प्रत्येक दिवशी सुमारे दीड लाख रुपये प्रवाशांना परत केले आहेत. सध्या शाळा-कॉलेजच्या परीक्षा सुरू असल्यामुळे रेल्वेला गर्दी कमी आहे. केवळ आरक्षण केलेलेच प्रवासी पाठ फिरवत आहेत असे नाही, तर नव्याने बुकिंगसुद्धा होत नसल्याची स्थिती रेल्वेस्थानकावर दिसून आली.

रेल्वेला रोज दीड लाखाचा फटका

कोरोनामुळे रोजचा दीड लाखांचा फटका रेल्वे प्रवाशांना बसत आहे. दोन दिवसांत रोज दीड लाख रुपये प्रवाशांना परत दिले आहेत. बुकिंगसाठीची गर्दीही कमी झाली आहे. एकंदरीतच कोरोनामुळे प्रवाशांना फटका बसला आहे. विशेष करून पुण्या-मुंबईला जाणाऱ्यांनी पाठ फिरवली आहे.
- शिवदास बियानी, सदस्य, रेल्वे सल्लागार समिती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महिलांना ऑफिसमध्ये बोलवायचा, नंतर स्वत:चे मूत्र पाजून...; कॅप्टन खरातचा विकृतपणा वाचून तळपायाची आग मस्तकात जाईल

X Down: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' डाऊन! कोट्यवधी युजर्सना तांत्रिक अडचणींचा फटका

कोकणाला डावलून केंद्राचा यूपीला मान! दादर-रत्नागिरी पॅसेंजर बंद, दादर-गोरखपूर ट्रेन सुरू; वर्षानुवर्षांच्या मागणीवर पाणी

Baramati Vidhan Sabha: बारामती पोटनिवडणूक काँग्रेस लढवणार? शरद पवार गटाच्या भूमिकेवर केलं भाष्य

Malegaon Crime : राष्ट्रवादी कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; मारेकरी सीसीटीव्हीत कैद, आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु

SCROLL FOR NEXT